सोने, चांदीच्या किमती घसरल्या, जाणून घ्या आज काय आहेत सोने आणि चांदीचे दर

भारतातील आजचे सोन्याचे दर : सध्या भारतात लग्नांचा मौसम सुरु आहे. त्यामुळे सोन्याच्या मागणीत साहजिकच वाढ झाली आहे. गुंतवणूक म्हणून देखील सोनेखरेदी हा उत्तम पर्याय आहे. सोमवार दिनांक १५ जुलै रोजी सोन्याच्या किमतीत किरकोळ घसरण दिसून आली.

त्याच बरोबर चांदीच्या किमतीही किंचित उतरल्या. गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या किमतीत सातत्याने चढ उतार दिसून येत आहेत.

gold silver price 15th july

आज भारतात २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति ग्रॅम ६ हजार ७५९ रुपये इतकी नोंदणी गेली, तर २४ कॅरेट सोन्याची किंमत (ज्याला ९९९ सोने असेही म्हटले जाते ) ७ हजार ३७४ रुपये प्रति ग्रॅम इतकी होती. भारतात १०ग्रम चांदीची किंमत ६५४ र्रुपये इतकी नोंदण्यात आली. १०० ग्राम चांदी ९ हजार ५४० रुपये आणि 1 किलो चांदी ९५ हजार ४०० रुपये इतका भाव झाला.

भारतात किती आहे प्रति ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत

1 ग्रॅम : ६ हजार ७५९ रुपये
८ ग्रॅम : ५४ हजार ०७२ रुपये
१० ग्रॅम : ६७,५९० रुपये
१०० ग्रॅम : ६ लाख ७५ हजार ९०० रुपये

भारतात आज २४ कॅरेट सोन्याची किंमत

1 ग्रॅम : ७ हजार ३७४ रुपये
८ ग्रॅम : ५८ हजार ९९२ रुपये
१० ग्रॅम : ७३,७४० रुपये
१०० ग्रॅम : ७ लाख ३७ हजार ४०० रुपये

भारतात आज १८ कॅरेट सोन्याची किंमत

1 ग्रॅम : 5 हजार ५३० रुपये
८ ग्रॅम : ४४ हजार २४० रुपये
१० ग्रॅम : ५५ हजार् ३०० रुपये
१०० ग्रॅम : ५ लाख ५३ हजार रुपये

मुंबईत २२ कॅरेट सोने प्रति 1 ग्रॅम ६ हजार ७५० रु, २४ कॅरेट सोने प्रति एक ग्रॅम ७ हजार ३६४ रु आणि १८ कॅरेट सोने 5 हजार ५२३ रु प्रति ग्रॅम या प्रमाणे होते तर पुण्यात हेच भाव अनुक्रमे ६ हजार ६५०, ७ हजार ३६४ रु आणि 5 हजार ५२३ इतके नोंदले गेले.

मिस्ड कॉल देऊन कशी जाणावी सोन्याची किंमत ?

तुम्ही स्वतः देखील सोन्याच्या ताज्या किमती सहज जाणून घेऊ शकता. त्यासठी तुम्हाला मिस्ड कॉल करण्याची आवश्यकता आहे. ८९५५६६४४३३ या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन तुम्ही २२ कॅरेट सोने आणि १८ कॅरेट सोन्याच्या किमती जाणून घेऊ शकता. कॉल करताच आपल्याला एक एसएमएस येईल ज्यात सोन्याच्या दरांची माहिती देण्यात आलेली असेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+