जर तुम्हाला अधिक डेटाची आवश्यकता नसेल तर Jio चा हा प्लॅन राहिलं फायदेशीर
सध्याच्या काळात अनेक घरांमध्ये किंवा कार्यालयामध्ये वाय-फाय असणे ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. वायफाय असल्यामुळे लोकांचा मोबाईल डेटा लवकर संपत नाही. अशा परिस्थितीत यूजर असा प्लॅन शोधतात, जे कमी किंमत आणि दीर्घ वैधतेसह येतात. जर तुम्हीही असाच प्लॅन शोधत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे.
आज आम्ही तुम्हाला असा एक रिचार्ज प्लॅन बद्ल सांगणार आहोत, जो दीर्घ वैधतेसह कमी किंमतीत येतो. जर तुमच्याकडे Jio चा प्रीपेड नंबर असेल तर तुम्ही कमी किंमतीचा आनंद घेऊ शकता. जाणून घेऊया जिओचा कोणता प्लॅन आहे, जो किफायतशीर किमतीत दीर्घ वैधता ऑफर करतो.

जिओचा 1899 रुपयांचा प्लॅन
जिओचा 1899 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 24GB हाय स्पीड डेटासह येतो. यामध्ये लोकल आणि एसटीडीसाठी अमर्यादित मोफत कॉलिंगची सुविधा उपलब्ध आहे. याशिवाय या प्लानमध्ये 3600 एसएमएस देखील उपलब्ध आहेत.
अतिरिक्त फायद्यांबद्दल बोलायचे झाल्यास तुम्हाला या प्रीपेड प्लॅनमध्ये Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud मध्ये मोफत प्रवेश देखील मिळेल. तसेच या प्लानमध्ये तुम्हाला Jio सिनेमाचे प्रीमियम सबस्क्रिप्शन मिळणार नाही.
किती दिवसांची वैधता असेल?
1899 रुपयांचा हा प्लॅन 336 दिवसांच्या वैधतेसह येईल. जर तुम्ही विचार करत असाल की प्लॅनची वैधता जास्त आहे. परंतु त्यात खूप कमी डेटा दिला जात आहे. कारण हा प्लान अश्या लोकांसाठी आहे जे कमी डेटा वापरतात आणि अनलिमिटेड कॉलिंगची गरज असते लोकांना हा प्लॅन अतिशय फायदेशीर असणार आहे.
दुसरीकडे, ज्या लोकांच्या घरी आणि ऑफिसमध्ये वाय-फाय उपल्बध आहे आणि त्यांना अधिक डेटा पॅकची आवश्यकता नाही, त्यांच्यासाठीही हा प्लॅन योग्य ठरू शकतो.












Click it and Unblock the Notifications