Jio आणि Airtel चे हे आहेत पैसे बचत करणारे प्लॅन! तुम्हाला माहितेय का? अनलिमिटेड कॉलिंग अन् बरेच काही
jio rs 1748 airtel rs 1849 plans : Reliance Jio आणि Airtel या भारतातील दोन प्रमुख दूरसंचार कंपन्यांनी अलीकडेच नवीन स्वस्त रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत. जिओचे सुमारे 49 कोटी आणि एअरटेलचे सुमारे 38 कोटी युजर्स आहेत.
TRAI (Telecom Regulatory Authority of India) च्या निर्देशांनुसार, या कंपन्यांनी डेटाशिवाय स्वस्त प्लॅन आणले आहेत, जेणेकरून ग्राहकांना अधिक परवडणारे पर्याय मिळू शकतील.

तुम्हीही Jio किंवा Airtel सिम वापरत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. दोन्ही कंपन्यांनी डेटाशिवाय स्वस्त रिचार्ज प्लॅन सादर केले आहेत. ज्या दीर्घ वैधतेसह येतात. हे प्लॅन आता मोबाईल युजर्ससाठी फायद्याचे ठरणार आहे, यासह त्यांच्या आर्थिक स्थितीच्या मोठ्या समस्येचे निराकरण करतील. कारण ते किफायतशीर आहेत आणि दीर्घ कालावधीसाठी वैध राहतील.
Jio चा नवीन प्लान : TRAI च्या सूचनेनंतर, Reliance Jio ने आपल्या करोडो वापरकर्त्यांसाठी डेटाशिवाय एक नवीन स्वस्त प्लॅन लॉन्च केला आहे.
- जे कोणत्याही डेटाशिवाय 336 दिवसांची दीर्घ वैधता मिळत आहे. या प्लॅनमध्ये उपलब्ध असलेल्या फायद्यांबद्दल सांगायचे तर, ग्राहक 336 दिवसांसाठी कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि 3600 मोफत एसएमएसचा लाभ घेऊ शकतील.
- याशिवाय या प्लॅनमध्ये इतरही काही फायदे दिले आहेत.
- ग्राहकांना Jio सिनेमाचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते, ज्याद्वारे ते OTT स्ट्रीमिंगचा लाभ घेऊ शकतात.
- यासोबतच Jio TV आणि Jio Cloud वर मोफत प्रवेश दिला जातो.
एअरटेलचा नवा स्वस्त प्लान
- एअरटेलने 1849 रुपयांचा डेटा नसलेला नवीन स्वस्त प्लान सादर केला आहे. ज्यामध्ये ग्राहकांना 336 दिवसांची दीर्घ वैधता मिळते.
- या प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि 3600 मोफत एसएमएस दिले जात आहेत.
- याशिवाय ग्राहकांना मोफत हॅलो ट्यूनचाही लाभ मिळतो.












Click it and Unblock the Notifications