ITR Filing Deadline: आयटीआर दाखल करण्याची अंतिम मुदत चुकली? ही आहे शेवटची संधी, घ्या जाणून
ITR Filing Deadline: तुम्ही अजून तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरला नसेल तर घाबरून जाण्याची गरज नाही. अजूनही आपल्याकडे संधी आहे, परंतु आपल्याला हे कार्य त्वरीत करावे लागेल. आर्थिक वर्ष 2023-24 (मूल्यांकन वर्ष 2024-25) साठी विलंबित आणि सुधारित रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2024 आहे.
31 डिसेंबर 2024 ही तारीख महत्त्वाची आहे. कारण यानंतर तुम्ही रिटर्न दाखल करू शकणार नाही. त्यानंतर तुम्हाला दंडाला सामोरे जावे लागू शकते. उशीरा रिटर्न भरणे म्हणजे काय आणि ते टाळण्याचे उपाय सोप्या भाषेत समजून घेऊया.

आयटीआर फाइल करण्याची अंतिम मुदत काय आहे?
ज्या करदात्यांने 2023-24 (FY 24) आर्थिक वर्षाची आयटीआर फाईल दाखल करण्याची 31 जुलै 2024 ही तारीख चुकवली असल्यास तुम्ही आता उशीरा ही रिटर्न दाखल करू शकता. ही अंतिम तारीख 31 डिसेंबर 2024 आहे.
उशीरा आयटीआर दाखल केल्यास काय दंड होईल?
- ज्यांचे उत्पन्न 5 लाखांपेक्षा जास्त आहे, अशा करदात्यांना 5,000 चा दंड आकारण्यात येईल. ज्यांचे उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी आहे, त्यांच्यासाठी फक्त 1,000 रुपये दंड आहे.
व्याज शुल्क
जर तुम्ही थकबाकी कर भरला नसेल, तर तुम्हाला कलम 234A अंतर्गत थकीत रकमेवर दरमहा 1% व्याज भरावे लागेल. हे व्याज तुमच्या एकूण देय रकमेत वेगाने वाढू शकते.
उशीरा ITR भरण्याचे तोटे
- जुन्या कर प्रणालीचे तोटे: जर तुम्ही तुमचा रिटर्न उशीरा भरला तर तुम्ही आपोआप नवीन कर प्रणालीकडे जाल. यामध्ये, कलम 80C आणि 80D अंतर्गत सूट उपलब्ध नाही.
- सूट आणि कपातीपासून वंचित : उशीरा दाखल करणाऱ्या करदात्यांना विविध सूट आणि कपातीचा लाभ घेता येणार नाही.
- भविष्यात तोटा पुढे नेऊ शकत नाही : जर तुम्ही वेळेवर रिटर्न भरले नाही, तर तुम्ही भविष्यात तुमचा भांडवली तोटा पुढे नेण्यास सक्षम राहणार नाही. याचा तुमच्या आर्थिक योजनांवर परिणाम होऊ शकतो.
काय करावे?
- दंड आणि व्याज टाळण्यासाठी 31 डिसेंबर 2024 पूर्वी तुमचे ITR दाखल करा.
- तुमच्या रिटर्नमध्ये तुम्ही चूक केली आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही सुधारित रिटर्नद्वारे ती दुरुस्त करू शकता.
महत्वाचे : आयटीआर फाइलिंगमध्ये होणारा विलंब टाळण्यासाठी आताच पुढाकार घ्या. वेळेवर आयटीआर दाखल करणे ही केवळ तुमची जबाबदारी नाही, तर यामुळे तुम्हाला अनेक आर्थिक लाभही मिळतात. 31 डिसेंबर 2024 पूर्वी तुमचे विलंबित किंवा सुधारित रिटर्न भरण्याची खात्री करा.












Click it and Unblock the Notifications