Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ITR Filing 2025 Deadline आयटीआर भरण्यासाठी फक्त एवढे दिवस शिल्लक! वेळेत न भरल्यास होऊ शकतो मोठा दंड

ITR Filing 2025 Deadline 15th September : आयटीआर भरणे हे पगारदार ते व्यापारी आणि सर्वच क्षेत्रातील संबंधित व्यक्तींसाठी महत्वाची गोष्ट आहे. अशातच आयटीआर भरण्यासाठी केवळ आज ११ सप्टेंबरचा दिवस धरुन फक्त ५ दिवस राहीले आहेत. त्यामुळे थोडी घाई करा लक्ष द्या आणि आयटीआर भरा.

आयटीआर जर निर्धारित वेळेत भरला नाहीतर तुम्हाला मोठा दंड बसू शकतो. हा दंड आयकर विभागाच्या मार्गदर्शक तत्व, नियमानुसार असेल. टॅक्स रिटर्न भरण्यासाठी पात्र असूनही तुम्ही अद्याप आयटीआर भरला नसेल तर लगेच भरा, कारण या कामासाठी आता फक्त ५ दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे भुर्दंड बसण्याआधीच आयटीआर भरलेले उत्तम आहे.

ITR Filing 2025

आयटीआरसाठी अंतिम मुदत कधी?

सध्याच्या नियमांनुसार, निर्धारण वर्ष २०२५-२६ (आर्थिक वर्ष २०२४-२५) साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर, २०२५ आहे. ही मुदत जवळ आल्यामुळे, कोट्यवधी करदाते आणि तज्ञ मंडळी सरकारकडून मुदत वाढवून मिळेल का याबद्दल उत्सुक आहेत.

मुदत वाढू शकते का?

काही करदाते आणि चार्टर्ड अकाउंटंट (CA) यांच्या म्हणण्यानुसार, आयकर विभागाच्या पोर्टलमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे, आयटीआर भरण्याच्या प्रक्रियेत आणि परतावा (refund) मिळवण्यात वेळ लागत आहे. याच कारणांमुळे, अनेकजण सरकारला मुदत वाढवण्याची विनंती करत आहेत. केंद्र सरकारच्या अर्थ मंत्रालयाकडून मुदत वाढवण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे,वेळेत आयटीआर भरणे हेच श्रेयस्कर आहे.

यापुर्वी कधी वाढवली होती मुदत?

सुरुवातीला, आयटीआर भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२५ होती. परंतु, आयकर विभागाने मे महिन्यात ती वाढवून १५ सप्टेंबर २०२५ केली होती. नवीन आयटीआर फॉर्म आणि ऑपरेटिंग सिस्टीम तयार होण्यास लागलेल्या वेळेमुळे, करदात्यांना अतिरिक्त वेळ देण्यात आला होता.

आयटीआर न भरल्यास काय होईल?

१५ सप्टेंबरनंतर आयटीआर भरल्यास, खालील अडचणी येऊ शकतात. करदात्यांना कलम 234F नुसार ५,००० रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. तुमचा परतावा (refund) मिळण्यासही उशीर होऊ शकतो.

किती लोकांनी भरला आयटी रिटर्न्स?

आयकर विभागाच्या माहितीनुसार, आतापर्यंत ५ कोटींपेक्षा जास्त आयटीआर दाखल करण्यात आले आहेत. १० सप्टेंबर रोजी फक्त १६ लाख आयटीआर भरले गेले, तर १५ सप्टेंबरपर्यंत अपेक्षित ८ कोटींच्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी दररोज ५४ लाख आयटीआर दाखल होणे आवश्यक आहे. मात्र अजूनही सुमारे २.७ कोटी करदात्यांनी अद्यापही रिटर्न भरलेले नाही.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+