ITR Deadline : 'आयटीआर' भरण्याची तारीख वाढवली की नाही? आयकर विभागानं काय सांगितलं, जाणून घ्या
ITR Deadline 2025 : आयटीआर भरण्याची आज १५ सप्टेंबर ही शेवटची तारीख असून या तारखेसंदर्भात सोशल मीडियावर काही दावे केले जात आहेत. त्यामुळे अनेक लोक निर्धास्त आहेत. तुम्ही सुद्धा ITR (आयटीआर) भरण्याची अंतिम मुदत वाढवल्याच्या सोशल मीडियावरील दाव्यांवर विश्वास ठेवला आहे का? थोडं थांंबा.. नुकसान होऊ शकतं...सत्य जाणून घेऊया.

सोशल मीडियावर काय दावा केलाय?
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक बनावट प्रेस रिलीज व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की ITR भरण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर, २०२५ पासून वाढवून ३० सप्टेंबर, २०२५ करण्यात आली आहे. हे वृत्त पूर्णपणे बनावट, फेक आहे.
सत्य काय आहे?
गुड रिटर्न्सनुसार, यावर स्पष्टीकरण देण्यासाठी, आयटॅक्स इंडियाने (आयकर विभाग) त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर केली. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, "आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख (मूळतः ३१.०७.२०२५ रोजी देय होती आणि १५.०९.२०२५ पर्यंत वाढवली गेली होती) ३०.०९.२०२५ पर्यंत वाढवण्यात आली आहे अशी एक खोटी बातमी प्रसारित होत आहे. आयटीआर दाखल करण्याची अंतिम तारीख १५.०९.२०२५ राहील."
काय म्हटलं आयकर विभागानं?
गुड रिटर्न्सनुसार, आयकर विभागाने स्पष्ट केले आहे की, आयटीआर भरण्याची अंतिम मुदत वाढवलेली नाही. सोशल मीडियावर फिरणाऱ्या खोट्या बातम्यांपासून सावध राहण्याची ही वेळ आहे. अधिकृत माहिती जाणून घ्या व आपल्या आयटीआर भरण्यासंदर्भात लगेच निर्णय घ्या, आयटीआर भरण्यासाठी काही वेळच राहीला आहे. आयकर भरण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर, २०२५ आहे. ती वाढवण्यात आलेली नाही.
अधिकृत माहितीचे स्त्रोत वापरा
आयकर विभागाने करदात्यांना अशा चुकीच्या माहितीला बळी न पडता, केवळ अधिकृत स्त्रोतांवरूनच माहिती घेण्याचा सल्ला दिला आहे. अधिकृत माहितीसाठी केवळ त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडल आणि वेबसाइटवर अवलंबून राहा, असे आयकर विभागाने म्हटले आहे.
जर १५ सप्टेंबरची अंतिम मुदत चुकली तर पुढे काय?
- जर तुम्ही १५ सप्टेंबरची अंतिम मुदत चुकवली, तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.
- तुम्ही ३१ डिसेंबर, २०२५ पर्यंत 'उशिरा ITR' भरू शकता. मात्र, यासाठी तुम्हाला दंड भरावा लागेल.
किती आहे दंड
- ५ लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांसाठी: ₹५,०००
- ५ लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्यांसाठी: ₹१,०००
- जर तुमचे उत्पन्न करपात्र मर्यादेपेक्षा कमी असेल तर कोणताही दंड नाही.
- उशिरा ITR भरल्यास, कलम २३४ए नुसार, थकीत करावर दर महिन्याला १% दराने व्याज देखील आकारले जाते.
आयकर विभागाने करदात्यांना मदत करण्यासाठी त्यांचे हेल्पडेस्क २४x७ कार्यरत असल्याचे सांगितले आहे. तुम्ही कॉल, लाइव्ह चॅट, वेबएक्स सत्रे किंवा ट्विटर/एक्स द्वारे त्यांच्याशी संपर्क साधू शकता.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications