Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ITR Audit करदात्यांनो टेंशन सोडा, तुमच्यासाठी ITR ऑडिट रिपोर्ट भरायची अंतिम मुदत वाढली! ही नवी तारीख

ITR Audit Deadline Extended : प्राप्तिकर भरणाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे! ज्यांना इनकम टॅक्स ऑडिट करणे बंधनकारक आहे, त्यांच्यासाठी सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) ने मोठा निर्णय घेतला आहे. गुड रिटर्न्सच्या वृत्तानुसार, पूर्वी 30 सप्टेंबर 2025 असलेली ऑडिट रिपोर्ट दाखल करण्याची अंतिम मुदत, आता थेट 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

ITR Audit Deadline Extended

मुदतवाढ का मिळाली?

विशेषतः नैसर्गिक आपत्ती आणि पुरामुळे त्रस्त असलेल्या भागांतील करदात्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता कागदपत्रे गोळा करण्यापासून ते ऑडिट पूर्ण करण्यापर्यंत, तुम्हाला आणखी एक पूर्ण महिना मिळाला आहे. आता एक महिन्याचा अतिरिक्त वेळ मिळाल्यामुळे करदात्यांना त्यांचे ऑडिट आणि ITR (Income Tax Return) फाइलिंग प्रक्रिया अधिक सुलभपणे पूर्ण करता येणार आहे.

कोणासाठी आहे ही मुदतवाढ?

या वाढलेल्या मुदतीचा फायदा सर्व कंपन्या, प्रॉपरायटरशिप फर्म्स आणि पार्टनरशिप कंपन्यांना मिळणार आहे. या सर्व संस्था आता 31 ऑक्टोबर 2025 पर्यंत आपले टॅक्स ऑडिट आणि ITR दाखल करू शकतात. प्राप्तिकर विवरणपत्र (ITR) भरण्यापूर्वी ऑडिट रिपोर्ट जमा करणे अनिवार्य आहे.

टॅक्स ऑडिट कोणासाठी आहे अनिवार्य?

टॅक्स ऑडिट ही एक प्रकारची आर्थिक तपासणी असते, ज्यामध्ये एखाद्या व्यवसाय किंवा व्यवसायाशी संबंधित आर्थिक नोंदी, खर्च आणि वजावटी तपासल्या जातात. कर योग्यरित्या भरला गेला आहे आणि कोणतीही चुकीची माहिती दिली गेली नाही, याची खात्री करणे हा त्याचा उद्देश असतो.

कोणासाठी आवश्यक?

  • ज्या व्यक्ती किंवा फर्मची व्यवसायातील उलाढाल किंवा एकूण प्राप्ती 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.
  • जर कॅश व्यवहार 5% पेक्षा कमी असतील, तर ही मर्यादा 10 कोटी रुपये होते.
  • प्रोफेशनल्ससाठी ही मर्यादा 50 लाख रुपये आहे.
  • पगारदार कर्मचारी: सामान्यतः पगारदार कर्मचाऱ्यांसाठी टॅक्स ऑडिटची गरज नसते, मात्र जर त्यांची व्यावसायिक कमाई 50 लाख रुपयांपेक्षा किंवा व्यावसायिक कमाई 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल, तर त्यांनाही ऑडिट करणे बंधनकारक आहे.

टॅक्सपेअर्सना काय फायदा?

31 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ मिळाल्याने टॅक्सपेअर्सना दंड (Penalty) आणि व्याजापासून वाचण्याची संधी मिळेल. वेळेवर आणि योग्य फाइलिंग झाल्यामुळे त्यांच्यावरील ताण कमी होईल आणि ऑडिट प्रक्रिया सोपी होईल.

हेही वाचा : ITR मध्ये चूक झालीय? घाबरू नका! सोप्या पद्धतीने पुन्हा भरा अन् दंड टाळा, ही प्रक्रिया समजून घ्या!

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+