Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ITR 2025 : 'या' राज्यात, इनकम टॅक्स फ्री! कोट्यवधींच्या उत्पन्नावरही लागत टॅक्स नाही,काय आहे कारण?

ITR 2025 : उत्पन्न आणि कर तशा पाहिल्या तर क्लिष्ट गोष्टी वाटतात, पण कशामुळे तर कराच्या कक्षेत काहीजण बसत नाहीत, त्यामुळे या गोष्टींकडे ते थोडेही लक्ष देत नाही. ही एक गोष्ट झाली, पण देशात असंख्य लोक दरवर्षी नियमित कर भरतात, त्यांना कराच्या कक्षेसाठी, जुनी आणि नवीन करप्रणाली यामधील फरक आणि करातील अनेक गोष्टी डोकेदुखीही ठरते पण भारतात असे एक राज्य आहे जिथे ही डोकेदुखी होत नाही आणि तिथल्या नागरिकांना करही भरावा लागत नाही...

भारतात एक अशी जागा आहे जिथे लोक कोट्यवधी रुपये कमवूनही आयकर भरत नाहीत, विश्वास बसणार नाही पण हो, हे खरे आहे. ही सूट २०२४-२५ या आर्थिक वर्षातही सुरू आहे. सिक्कीम राज्यातील काही पात्र लोकांनाच याचा लाभ मिळतो. सिक्कीममधील काही लोकांना आयकर का भरावा लागत नाही ते आपण जाणून घेऊया.

ITR 2025 only indian state where income are still tax free

सिक्कीम हे देशातील असे एक राज्य आहे जिथे काही पात्र लोकांना आयकर भरण्याची आवश्यकता नाही. त्यांचे उत्पन्न नोकरीतून असो किंवा गुंतवणूक आणि आर्थिक मालमत्तेतून, जर एखादी व्यक्ती कर नियमाच्या कक्षेत येते, तर तिला कोणताही कर भरावा लागत नाही.

काय आहे विशेष सुट?

भारतीय संविधानाच्या कलम ३७१ (एफ) आणि आयकर कायद्याच्या कलम १० (२६एएए) अंतर्गत सिक्कीमला ही सूट देण्यात आली आहे. या गोष्टीचा फायदा सिक्कीमच्या मूळ रहिवाशांना मिळतो आणि याद्वारे कायदेशीर कर सूट मिळते. १९७५ मध्ये सिक्कीम भारताशी जोडले गेले होते. त्यावेळी झालेल्या करारानुसार, सिक्कीमला काही विशेष अधिकार प्रदान करण्यात आले होते. या निर्णयानंतर, काही अटींनुसार, सिक्कीमच्या मूळ रहिवाशांना करातून सूट देण्यात आली आहे, जी आजही सुरू आहे.

कुणाला मिळते कर भरण्यात सूट

आता तुम्ही म्हणाल की, चला सिक्कीममध्ये राहूया अन् तिथेच कमवुया अथवा नोकरी करुया म्हणजे करात सुट मिळल पण हे तुमच्यासाठी येथे असे होत नाही, प्रत्येकालाच करातून सुट मिळते असे नाही तर सिक्कीम सब्जेक्ट्स रेग्युलेशन १९६१ अंतर्गत नोंदणीकृत लोक या सूटसाठी पात्र आहेत. १९७५ पूर्वीचे मूळ रहिवासी असलेल्या लोकांनाच या गोष्टीचा लाभ मिळू शकतो.

सिक्कीम देशाच्या इतर राज्यांपेक्षा वेगळे कसे आहे?

देशातील इतर शहरांमध्ये, विशिष्ट मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या लोकांना आयकर विवरणपत्र भरणे आवश्यक आहे. त्याच वेळी, सिक्कीममधील काही पात्र लोकांना आयकर भरण्याची आवश्यकता नाही. जरी त्यांचे उत्पन्न कोट्यवधींमध्ये असले तरी त्यांना आयकर भरण्याची आवश्यकता नाही.

अजून कुणाला कर भरावा लागत नाही..

  • सिक्कीममधील पात्र लोकांचे संपूर्ण उत्पन्न कर कक्षेबाहेर आहे, ज्यामुळे ते या विशेष सुविधेसह देशातील इतर राज्यांपेक्षा वेगळे आहे.
  • काही विशेष प्रकरणांमध्ये देशात करमुक्त उत्पन्नाची तरतूद आहे. यामध्ये शेतीतून मिळणारे उत्पन्न करातून सूट आहे.
  • एनआरई खात्यात मिळणारे व्याज देखील करमुक्त आहे.
  • विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती देखील कर स्लॅबच्या बाहेर ठेवण्यात आल्या आहेत.
  • लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे सूट फक्त विशेष उत्पन्नासाठी आहे.
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+