Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Israel Iran War effect : कामाची बातमी! इस्रायल-इराण युद्धाचा भडका! देशात 'या' वस्तू महागणार

Israel Iran War effect : इराण आणि इस्त्रायल यांच्यात युद्धाचा भडका वाढत असतानाच त्याची झळ तेथील देशाला बसत असतानाच आता महागाईची झळ जगाला बसत आहे. या युद्धामुळे भारतातही महागाईची मोठी झळ बसली आहे. सोन्यापासून पेट्रोल डिझेलपर्यंत सर्वच गोष्टींचा फटका देशातील नागरिकांना बसणार आहे.

इराण आणि इस्रायल यांच्यात युद्धाची ठिणगी पेटली. या दोन्ही देशांमध्ये गेल्या काही वर्षांपासून मोठा संघर्ष आहे. इराणने इस्रायलवर क्षेपाणास्त्र हल्ला केल्याने दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर आहेत. यामुळे जागतिक आणि भारतीय पर्यायाने स्थानिक बाजारातही महागाई वाढणार आहे. काय वाढणार, हे आपण आज जाणून घेणार आहोत.

Israel Iran War effect

सोने - चांदीचे दर वाढणार

युद्धासारख्या जागतिक अस्थिरतेच्या काळात गुंतवणूकदार अनेकदा सुरक्षित व्यापार म्हणून सोने आणि चांदीच्या गुंतवणुकीकडे वळतात. त्यामुळे त्यांची मागणी वाढते आणि किमती वाढतात. भारतात सोन्याचा खप आधीच खूप जास्त आहे, शिवाय महिलांच्या आभूषणासाठी सोन्यालाच पसंती दिली जाते त्यामुळे सोने सुमारे ऐंशी हजार रुपये प्रतितोळ्यापर्यंत जाईल अशी शक्यता व्यावसायिक सांगत आहेत. दागिने आणि ज्वेलरी उद्योगातील वस्तुंच्या किमती वाढून त्याचा परिमाण सर्व सामान्य ग्राहकांवर होईल.

पेट्रोल -डिझेल

इराण हा जगातील सर्वात मोठा कच्च्या तेल उत्पादकांपैकी एक देश आहे. भारत कच्च्या तेलाचा मोठी आयात करणारा देश आहे. त्यामुळे आपण इराणकडून पेट्रोल डिझेल आयात करतो. इराण आणि इस्रायल यांच्यात युद्ध झाल्यास याचा इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम होईल. पर्यायाने टंचाईची स्थिती निर्माण झाल्यास पेट्रोल, डिझेल आणि इतर पेट्रोलियम पदार्थ महाग होतील. याचा भारतावर मोठा परिणाम होणार आहे. कारण भारत आपल्या तेलाच्या गरजांसाठी मोठ्या प्रमाणात आयातीवर अवलंबून आहे.

खाद्यपदार्थ

इराण आणि इस्रायल यांच्यातील संघर्षाचा परिणाम जागतिक समुद्र मार्गावर होणार आहे. होर्मुजच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या व्यापारावर याच परिमाण होऊ शकतो. या मार्गाने मोठ्या प्रमाणात अन्न आणि कृषी उत्पादनांची वाहतूक केली जाते. जर या प्रदेशात युद्ध झाले तर हा वाहतुकीचा मार्ग बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गहू, साखर आणि इतर कृषी उत्पादनांसारख्या अन्नपदार्थांच्या किंमती वाढतील. भारतात या महागाईचा थेट परिणाम खाद्यपदार्थांवर होऊ शकतो. कारण इंधनाचे दर भडकले तर वाहतूक खर्च वाढेल व त्याचा भार अन्नपदार्थांच्या किमतीवर होऊ शकतो.

नैसर्गिक वायू आणि वीज

इराण हा नैसर्गिक वायूचा सर्वात मोठा उत्पादक देश आहे. युद्धामुळे इराणच्या गॅस निर्यात क्षमतेवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे युरोप आणि आशियात ऊर्जा संकट निर्माण होऊ शकते. भारतातही नैसर्गिक वायूचे दर वाढू शकतात, ज्याचा थेट परिणाम घरगुती गॅस सिलिंडर आणि वीजनिर्मितीवर होऊ शकतो.

बांधकाम क्षेत्रावर परिणाम?

इराणमधील रासायनिक व धातूउद्योगही जागतिक स्तरावर महत्त्वाची भूमिका बजावतो. या क्षेत्रात काही अस्थिरता आल्यास या उद्योगांशी संबंधित कच्च्या मालाच्या किमती वाढू शकतात. यामुळे पोलाद, अॅल्युमिनियम आणि इतर औद्योगिक धातूंच्या किमतींवरही परिणाम होऊ शकतो, ज्याचा विपरीत परिणाम भारतीय बांधकाम आणि उत्पादन क्षेत्रावर होणार आहे.

औषध उत्पादनं अन् खतं

इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा अप्रत्यक्ष परिणाम भारतीय औषध उद्योगावरही होऊ शकतो. भारत औषधांसाठी मोठ्या प्रमाणात कच्चा माल परदेशातून आयात करतो आणि आखातात कोणताही तणाव झाल्यास याहा परिणाम पुरवठा साखळीवर होईल. इराण युरिया आणि इतर खतांचा प्रमुख निर्यातदार आहे. युद्धामुळे या उत्पादनांचा पुरवठा विस्कळीत झाल्यास जागतिक खत बाजारावर परिणाम होईल आणि भारतातही खतांचे भाव वाढण्याची शक्यता आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+