Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

तिकडे इराण-इस्त्रायल युद्धविराम; इकडे खूशखबर! सोन्याचे दर उतरले! फटाफट चेक करा आजचे ताजे भाव

Iran-Israel ceasefire Gold prices fall in india : इराण इस्त्रायल युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर शेअरमार्केटसह सराफा बाजारातही मोठा दिलासा दिसून आला. आज सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले आहेत. आज २४ जून २०२५, मंगळवारी सोन्याचे दर दोन आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आले. त्यामुळे प्रती शंभर ग्रॅम सोन्याचे दर ८ हजार २०० रुपयांनी कमी झाले आहेत.

Iran-Israel ceasefire Gold prices fall in india

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण आणि इस्रायलमध्ये युद्धबंदी झाल्याचे वक्तव्य केले आहे. त्यामुळे सुरक्षित गुंतवणूक मानल्या जाणाऱ्या सोन्याची मागणी लगेचच कमी व्हायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे आज सोन्याचे दर घसरले आहेत, आम्ही सांगतो की, कालही सोन्याचे दर घसरले होते. आज आपण ताजे दर किती आहेत हे जाणून घेऊया.

Take a Poll

आज सोन्याचा दर किती आहे..

आज देशात प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा भाव ८२० रुपयांनी घसरून १,००,०२० रुपयांवर आला आहे. एक दिवस आधी म्हणजे काल २३ जून २०२५ सोमवारी तो १,००,८४० रुपयांवर होता. याशिवाय, प्रति १०० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ८,२०० रुपयांनी घसरून १०,००,२०० रुपयांवर आला आहे. एक दिवस आधी तो १०,०८,४०० रुपयांवर होता.

आज २२ कॅरेट सोन्याचा दर किती आहे..

प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ७५० रुपयांनी घसरून ९१,७०० रुपयांवर आला आहे. काल २३ जून रोजी सराफा बाजारात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ९२,४५० रुपये होता. त्याच वेळी, १०० ग्रॅम सोन्याचा दर ७५०० रुपयांनी घसरून ९,१७,००० रुपयांवर आला आहे. एक दिवस आधी तो ९,२४,५०० रुपयांवर आला होता.

या आठवड्यात सोन्याचे भाव का वाढले होते...

मीडिया रिपोर्टनुसार, सोमवारी इस्रायलने इराणवर हल्ले तीव्र केल्याने सोन्याच्या किमती वाढल्या होत्या, तर इराणने अमेरिकेच्या अणुस्थळांवरील हल्ल्याचा बदला घेण्याचा इशारा दिला होता, यामुळे सोने उच्चांकावर पोहचले होते. सोमवारी सोन्याचा भाव ०.८ टक्क्यांनी वाढून सुमारे $३,४०० प्रति औंस झाला. इस्रायलने इराणमधील अधिक तळांवर हल्ला केला आणि इराणने अमेरिकेच्या हल्ल्यांना "योग्य आणि कडक" प्रत्युत्तर देण्याचे म्हटले तेव्हा ही वाढ झाली.

सोन्याच्या किमती घसरण्याची ही कारणे

मध्यपूर्वेतील या तणावामुळे या वर्षी सोन्याच्या किमतीत सुमारे ३० टक्के वाढ झाली, हे जरी स्पष्ट असले तरीही इराण आणि इस्त्रायलदरम्यान, नुकतीच झालेल्या युद्धविरामाच्या घोषणेमुळे सोने बाजारात मागणीत घट होत आहे. जर या तणावामुळे तेल आणि वायूसारख्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढत राहिल्या तर महागाई आणखी वाढू शकते. यामुळे अमेरिकन मध्यवर्ती बँक फेडरल रिझर्व्हला व्याजदर कमी करणे कठीण होईल, जे सोन्यासाठी नकारात्मक लक्षण असू शकते, कारण सोने व्याज देत नाही.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+