Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

iPhone -15 ची किंमत घसरली! किती झाले आहेत भाव? जाणून घ्या नवीन किंमत, बँक ऑफर्स आणि एक्सचेंज डील

iPhone 15 price dropped : अनेकांचे आयफोन घेण्याचे आणि वापरण्याचे स्वप्न असते. ते स्वप्न प्रत्येकालाच सहज शक्य होत नाही, कारण प्राधान्यक्रम आपल्या कुवतीनुसार असतात, इच्छा आणि प्राधान्यक्रम यात फार मोठा फरक असतो पण आता अ‍ॅपलने हा फरक कमी करण्याचा प्रयत्न केला आहे. भारतात ऑयफोन -१५ ची किंमत आता कमी झाली आहे.

iPhone 15 price dropped

ऑयफोन घेणाऱ्यांसाठी ही स्मार्ट बातमी समोर आली आहे. आता अ‍ॅपलच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन आयफोन १५ ची किंमत आता ६० हजार रुपयांपेक्षा कमी झाली आहे. हा फोन भारतात लाँचच्या वेळी सुमारे ७९ हजार ९०० रुपयांना उपलब्ध होता, परंतु आता निवडक ऑनलाइन विक्री आणि ऑफर्स अंतर्गत, तो सुमारे ५८,००० ते ६०,००० रुपयांना खरेदी करण्याची संधी आहे. विशेष म्हणजे काही बँकाही यासाठी खास लोनच्या ऑफर देत आहेत.

कुठे मिळणार मोठी सूट?

आयफोन १५ वरील सर्वात मोठी सूट सध्या फ्लिपकार्ट आणि अमेझॉन सारख्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवर दिसून येत आहे. या साइट्सवर काही बँक ऑफर्स आणि एक्सचेंज डीलसह आयफोन १५ ची किंमत लक्षणीयरीत्या कमी करण्यात आली आहे. HDFC आणि SBI सारख्या बँकांच्या कार्डने पेमेंट केल्यास, 3,000 ते 5,000 रुपयांपर्यंत अधिक सूट दिली जात आहे. तुमचा जुना फोन एक्सचेंज केल्यावर तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंत अतिरिक्त सूट देखील मिळू शकते.

iPhone 15 ची वैशिष्ट्ये काय आहेत

डिस्प्ले: 6.1 इंच सुपर रेटिना XDR OLED
स्क्रीन प्रोसेसर: A16 बायोनिक चिप (जो iPhone 14 Pro मध्ये देखील होता)
कॅमेरा: 48MP
फर्स्ट कॅमेरा + 12MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा
बॅटरी: चांगला बॅटरी बॅकअप आणि जलद चार्जिंग
सपोर्ट डिझाइन: डायनॅमिक आयलंडसह नवीन ताजा लूक

अशी सूट का दिली जात आहे?

iPhone 15 च्या किमतीत घसरण होण्यामागे दोन प्रमुख कारणे असल्याचे मानले जात आहे, त्यातील पहिले कारण म्हणजे iPhone 16 लाँच होण्याच्या जवळ आहे Apple दरवर्षी सप्टेंबरमध्ये नवीन आयफोन लाँच करते. अशा परिस्थितीत, आयफोन १५ ची किंमत कमी करणे ही एक रणनीती आहे, जेणेकरून स्टॉक लवकर संपेल.

दुसरे कारण बाजारात वाढती स्पर्धा - सॅमसंग, वनप्लस आणि इतर ब्रँडचे फ्लॅगशिप फोन देखील वैशिष्ट्यांच्या आणि किंमतीच्या बाबतीत सतत आयफोनशी स्पर्धा करत आहेत. भारतीय बाजारपेठेत ग्राहकांना टिकवून ठेवण्यासाठी अ‍ॅपल आता किंमती रास्त करत आहे.

कधी खरेदी करावा आयफोन?

जर तुम्ही आयफोन १५ घेण्याचा विचार करत असाल, तर सध्या संधीनुसार ही सर्वोत्तम वेळ असू शकते. पुढील काही महिन्यांत आयफोन १६ लाँच झाल्यानंतरही, आयफोन १५ चा स्टॉक हळूहळू कमी होईल आणि मागणी जास्त असल्याने किंमत पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. आयफोन १५ आता भारतीय बाजारात त्याच्या सर्वात कमी किमतीत उपलब्ध आहे. ज्यांना अ‍ॅपलचा प्रीमियम स्मार्टफोन घ्यायचा आहे परंतु किंमतीमुळे ते खरेदी करण्यात अडचणी येत आहेत त्यांच्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. वेळेत ऑफरचा फायदा घ्या आणि तुमच्याकडे बँक कार्ड ऑफर किंवा एक्सचेंज डीलचा पर्याय आहे याची खात्री करा.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+