SIP investment : एसआयपीत गुंतवणूक करुन तुम्ही 10 वर्षात करोडपती होऊ शकता! हे गणित समजून घ्या
SIP investment : म्युच्यूअल फंड, सिस्टिमॅटीक इन्व्हेसमेंट प्लॅन अर्थात एसआयपी हे एक सामान्य ते मध्यमवर्गीय लोकांसाठी एक प्रबळ साधन मानले जाते. एक दीर्घकालीन संपत्ती निर्मितीसाठी एसआयपीला बहुतांशजण प्राधान्य देतात. हा एक गुंतवणुकीचा लोकप्रिय आणि आर्थिक कुवतीला साजेसा अनुकूल मार्ग आहे. अगदी कमी रकमेतही एसआयपीद्वारे गुंतवणूक करता येते. चिरकाल आणि शाश्वत परतावा देणारा हा सध्याच्या ट्रेंडमधील लोकप्रिय मार्ग आहे.
अनेक जणांना एसआयपीत किती रक्कम गुंतवावी, त्याचा परतावा किती असतो? याची कल्पना असतेच असे नाही, पण ज्यांना एसआयपीबद्दल बहुतांश गोष्टी माहित असतात ते लोक एक नियोजन आणि विशिष्ट आर्थिक रणनीती आखून भविष्यकाळ सुकर करण्यासाठी आणि चांगला परतावा मिळव्यासाठी प्रयत्नशील असतात.

बरेच गुंतवणूकदार आता जास्तीत जास्त परतावा मिळवण्यासाठी 'स्टेप-अप SIP' सारख्या तंत्रांचा अवलंब करत आहेत. मिडिया रिपोर्ट्स आणि व्हायरल पोस्टनुसार, काही लोकांनी योग्य आर्थिक नियोजन करुन त्यांच्या नोकरी, साध्या कामाच्या मिळकतीतून एसआयपीमधून जवळपास तीन ते चोर कोटी रुपये कमावले आणि 45 व्या वर्षी नोकरीतून निवृत्त घेतली.
एनडीटीव्ही प्राफीटनुसार, 'स्टेप-अप SIP' अंतर्गत, गुंतवणूकदार कंपाउंडिंगच्या शक्तीचा फायदा घेण्यासाठी वेळोवेळी त्यांचे विद्यमान योगदान वाढवू शकतात. शेअर बाजाराशी संबंधित गुंतवणूक उच्च जोखीम घेऊन येते, परंतु ती वर्षानुवर्षे स्प्रेड करणे फायदेशीर ठरू शकते. खास बाब म्हणजे, अर्थजगतात असे अनेक लोकप्रिय म्युच्युअल फंड हाऊसेस आहेत ज्यांनी सरासरी वार्षिक 12 ते 14 टक्के परतावा ज्यांनी गुंतवणूकदारांना दिला आहे; म्हणूनच कमी कालावधीत 1 कोटी रुपयांच्या मोठ्या निधीचे टार्गेटही त्यांच्या आवाक्यात असते, एसआयपीचे अनेक फायदे आहेत ज्यामुळे तुम्ही तुमचे भविष्य, मुलांचे शिक्षण आणि आजाराच्या कठीण काळात समर्थपणे तोंड देऊ शकाल. एसआयपीत गुंतवणूक करुन 10 वर्षात करोडपती कसे होता येऊ शकेल हे आपण जाणून घेऊया.
SIP वापरून 10 वर्षांत करोडपती कसे होता येईल?
यासाठी लक्ष्यित निधी 1 कोटी रुपये आहे आणि गुंतवणूक कालावधी 10 वर्षांचा आहे. यामध्ये वार्षिक परतावा 12 टक्के देणाऱ्या म्युच्युअल फंडमध्ये साध्या एसआयपी धोरणासह, गुंतवणूक कशी वाढेल ते पाहुया.
- या एसआयपीसाठीचा निर्धारित कालावधी: 10 वर्षे असेल.
- दरमहा एसआयपी: 43,500 रुपये असेल.
- एकंदरीत अंदाजे परतावा: 12 टक्के असेल असे गृहीत धरता येईल
- तुम्ही गुंतवलेली रक्कम: 52 लाख 20 हजार रुपये एवढी होईल.
- मिळणारा अंदाजे परतावा: 48 लाख 86 हजार 749 रुपये.
- एकूण मूल्य: 1 कोटी 1 लाख 6 हजार 749 रुपये
वरील प्रकरणात, दरमहा 43 हजार 500 रुपयांची एसआयपी रक्कम अनेक लोकांसाठी परवडणारी रक्कम असू शकते. अशा परिस्थितीत, एखादी व्यक्ती 'स्टेप-अप एसआयपी' निवडण्याचा पर्याय देखील निवडू शकते जी उत्पन्न वाढत्या वर्षानुवर्षे योगदान वितरीत करू शकते.
आणखी एक उदाहरण बघुया..
- एसआयपीचा कार्यकाळ: 10 वर्षे
- दरमहा एसआयपीत गुंतवणुकीची रक्कम : 30 हजार रुपये
- वार्षिक स्टेप-अप: दरवर्षी गुंतवणुकीच्या 10 टक्के
- मिळणारा अंदाजे परतावा: 12 टक्के
- गुंतवलेली रक्कम : 57 लाख 37 हजार 472 रुपये
- मिळणारा अंदाजे परतावा: 43 लाख 85 हजार 505 रुपये
- एकूण मूल्य: 1 कोटी 1 लाख 22 हजार 978 रुपये
'स्टेप-अप एसआयपी' पर्यायात गुंतवणूक मुल्य कमी करता येते
'स्टेप-अप एसआयपी' पर्यायात सुरुवातीच्या एसआयपी कमी वाटत असल्या तरी, एकूण गुंतवणूक रक्कम जास्त असते. म्हणूनच, गुंतवणूकदाराच्या निवडीवर अवलंबून असते की त्याला मोठी रक्कम आगाऊ द्यायची आहे आणि गुंतवणूक मूल्य कमी करायचे आहे की योगदानांमध्ये अधिक लवचिक राहायचे आहे.
Disclaimer : ही एसआयपीशी निगडीत माहिती जरी असली तरीही कोणताही व्यवहार आणि एसआयपीत गुंतवणूक करण्यापुर्वी संबंधित एसआयपी प्लॅन आणि त्यासंबंधित तज्ज्ञांशी सल्लामसलत करावी आणि गुंतवणूक करावी.












Click it and Unblock the Notifications