Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

भारतातील श्रीमंत झाले अतिश्रीमंत; देशातील 100 जणांकडे 90 लाख कोटींवर संपत्ती! अंबानी सर्वात श्रीमंत

India's Richest 100 people : भारतीय शेअर बाजारात या वर्षात झालेल्या जबरदस्त वाढ झाली. या वाढीचा फायदा सामान्य गुंतवणूकदारांपासून ते देशातील सर्वाधिक श्रीमंतांना झाला आहे. त्यामुळे आता देशातील सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत मुकेश अंबानी वरच्या क्रमांकावर आहेत तर गौतम अदानीही काही कमी नाही. आपण या लेखात कशा प्रकारे शेअर बाजारातील या प्रचंड वाढीने देशातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींची संपत्ती कशी गगनाला भिडलीय हे जाणून घेणार आहोत.

शेअर बाजाराची दमदार कामगिरी

यावर्षी भारतीय शेअर बाजाराने तब्बल 30 टक्क्यांची वाढ दर्शवलीय. आर्थिक उलाढाली, गुंतवणूक धोरण, आणि जागतिक बाजारातील अनुकूलतेचा परिणाम म्हणून भारतीय शेअर बाजारात जबरदस्त तेजी आलीय. हे वर्ष सामान्य गुंतवणूकदारांसाठी तर फायदेशीर ठरलं, पण विशेषत: देशातील श्रीमंत वर्गासाठी खूपच सुवर्णमय ठरलंय.

India s Richest 100 people have a wealth of over 90 lakh crores

सर्वाधिक श्रीमंत 100 व्यक्तींची संपत्ती

फोर्ब्सच्या 'इंडियाज 100 रिचेस्ट 2024' अहवालानुसार, देशातील सर्वाधिक 100 श्रीमंत व्यक्तींनी या वर्षात पहिल्यांदाच 90 लाख कोटींहून अधिक संपत्ती गाठलीय. या संपत्तीत तब्बल 26.50 लाख कोटी रुपयांची भर पडलीय. म्हणजेच या संपत्तीमध्ये 40 टक्क्यांहून अधिक वाढ झालीय, ज्यामध्ये शेअर बाजारातील तेजीचा मोठा हात आहे. विशेष म्हणजे, 80 टक्के श्रीमंत या यादीत आधीच्या तुलनेत आणखी श्रीमंत झाले आहेत.

देशातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती म्हणून रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी पुन्हा एकदा अव्वल स्थानी आहेत. त्यांच्या संपत्तीत यावर्षी २.३ लाख कोटी रुपयांची वाढ झालीय. यामुळे त्यांची एकूण संपत्ती प्रचंड प्रमाणात वाढलीय. शेअर बाजारातील वाढलेल्या शेअर्सचा मुकेश अंबानी यांच्या संपत्तीवर मोठा प्रभाव पडलाय.

गौतम अदानी यांची संपत्ती वाढली

यादीत दुसऱ्या स्थानी असलेले गौतम अदानी यांच्याकडेही प्रचंड संपत्ती आहे. त्यांची संपत्ती 4 लाख कोटी रुपयांनी वाढलीय. अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये झालेल्या वाढीमुळे त्यांच्या संपत्तीमध्ये मोठी भर पडलीय. बाजारातील अनुकूल वातावरणाने अदानी ग्रुपलाही मोठ्या फायद्यात आणलेय.

या शेअर बाजाराच्या उधाणामुळे देशातील सर्वाधिक श्रीमंत 100 व्यक्तींच्या संपत्तीत तब्बल दुपटीहून अधिक वाढ झालीय. या 100 जणांपैकी 58 जणांच्या संपत्तीत 8 हजार 397कोटी रुपयांनी वाढ झालीय. या संपत्तीच्या वाढीत मुख्यत: त्यांच्या कंपन्यांच्या वाढलेल्या शेअर्सचा मोठा वाटा आहे. उद्योगातून मिळणाऱ्या नफ्यापेक्षा शेअर्सच्या वाढीनेच श्रीमंतांची संपत्ती जास्त प्रमाणात वाढली आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+