Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

नाद करायचा नाय..! जगातलं 11 टक्के सोनं भारतीय बायका गळ्यात घालून मिरवतात; अमेरिका-चीन गिणतीतही नाही

भारतात प्राचीन काळापासून सोन्याला विशेष महत्त्व आहे. जुन्या काळात सोने हे केवळ संपत्तीचे प्रतीक नव्हते, तर शक्ती आणि प्रतिष्ठेचे प्रतीक देखील मानले जात होते. आता काळ बदलला मात्र सोन्याची चमक आणि महत्त्व कमी झाले नाही. उलट ते वाढत चालले आहे. भारतीय महिलांना सोन्याच्या दागिन्यांवर विशेष प्रेम आहे. भारतीय महिलांकडे किती सोने आहे, याची चर्चा कायमच होते. मात्र आता काही दिवसांपूर्वी आलेली भारतीय महिलांकडील सोन्याची आकडेवारी डोळे दिपवणारी आहे.

gold rates

जगातील ११ टक्के सोने भारतीयांकडे

वर्ल्ड गोल्ड काॅन्सिलच्या मते, भारतीय महिलांकडे २४ हजार टन सोने आहे. हे सोने दागिन्यांच्या स्वरुपात आहे. या आकड्यांचा विचार केला तर जगभरातील एकूण सोन्याच्या साठ्यांपैकी हा साठा ११ टक्के आहे. भारतीय महिलांकडे एवढे सोने आहे की, जगातील पाच देशांचे मिळूनही एवढे सोने नाही.

कुणाकडे किती आहे सोने?

फायनान्शियल एक्सप्रेसच्या अहवालानुसार, जर आपण सरकारी राखीव निधीबद्दल बोललो तर अमेरिका सर्वात आघाडीवर आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत अमेरिकेकडे ८,१३४ टन सोने होते. जे जगात सर्वाधिक आहे. यानंतर जर्मनी, चीन आणि भारताचा नंबर लागतो. भारताकडे ८७६ टन सोने आहे. जे राष्ट्रीय राखीव निधीमध्ये समाविष्ट आहे. पण खरा धक्कादायक आकडा तेव्हा येतो जेव्हा आपण सामान्य लोकांकडे असलेल्या सोन्याबद्दल बोलतो. अहवालांनुसार भारतीय कुटुंबांकडे सुमारे २४,००० टन सोने आहे. जे जगभरातील मध्यवर्ती बँकांच्या एकूण साठ्याइतके आहे. दुसऱ्या क्रमांकावर चीनचे लोक आहेत. ज्यांच्याकडे सुमारे २०,००० टन सोने आहे.

सोन्याच्या बाबतीत भारत अव्वल

अमेरिकेकडे ८,००० टन, जर्मनीकडे ३,३०० टन, इटलीकडे २,४५० टन, फ्रान्सकडे २,४०० टन आणि रशियाकडे १,९०० टन सोने आहे. याचा अर्थ असा की जर या देशांचे सोन्याचे साठे एकत्र केले तर ते भारतीय महिलांकडे असलेल्या सोन्यापेक्षा कमी असेल. भारतीय महिलांकडे २४ ते २५ हजार टन सोन्याचे दागिने आहेत. म्हणजेच या पाच देशांतील सोन्यापेक्षा जास्त सोने भारतीय महिला आपल्या अंगावर घालतात.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+