अर्थव्यवस्थेत भारत चौथा मग पहिल्या दुसऱ्या अन् तिसऱ्या नंबरवर कोण? जपाननंतर 'या' देशाला मागे टाकणार
India is fourth in economy who is first second and third : भारतासाठी एक गोड बातमी नीती आयोगाच्या सीईओंनी दिली आहे. जगातील पाचवी अर्थसत्ता असलेला भारत आता चौथ्या क्रमांकावर आला आहे. भारतीय अर्थव्यवस्थेने जपानच्या अर्थव्यवस्थेला मात देत ही किमया साधली आहे. आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रह्मण्यम यांनी ही माहिती दिली.
दिल्लीतील भारत मंडपम् येथे नीती आयोगाची प्रशासकीय परिषदेची बैठक काल पार पडली. काल या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व राज्यांचे मुख्यमंत्री नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीव्हीआर सुब्रम्हण्यम आणि नीती आयोगाचे पुर्ण कार्यकारी मंडळातील अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या बैठकीत भारत अर्थव्यवस्थेत चौथ्या स्थानावर आल्याचे सीईओ सुब्रम्हण्यम यांनी सांगितले त्यानंतर त्यांनी भारत तिसरी जागतिक अर्थसत्ता कधी बनेल याचीही माहिती दिली आहे. आज आपण जगातील सर्वात मोठी पहिली, दुसरी आणि तिसरी अर्थव्यवस्था कोणत्या देशाची आहे आणि भारत तिसरी अर्थव्यवस्था कधी बनणार हे जाणून घेऊया.

भारताची अर्थव्यवस्था केवढी आहे?
एप्रिलमध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आयएमएफने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारत 2025 पर्यंत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल, असे सांगितले होते त्यानंतर यासंदर्भात अधिकृत घोषणा नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केली. आहे. भारताचे निव्वळ सकल देशांतर्गत उत्पादन- जीडीपी GDP $4.187 ट्रिलियन पर्यंत पोहोचला आहे, भारताची अर्थव्यवस्था सातत्याने वाढत आहे, मुख्यतः मजबूत देशांतर्गत मागणी आणि अनुकूल लोकसंख्याशास्त्रीय ट्रेंड महत्वाचा ठरला आहे.
जपानची अर्थव्यवस्था केवढी आहे?
भारताच्या अर्थव्यवस्थेपेक्षा थोडीशी जास्त जपानची अर्थव्यवस्था होती. आता जपानची अर्थव्यवस्था $4.186 ट्रिलियन आहे. 2024 मध्ये भारत पाचव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था होता, त्यावेळी भारताचा जीडीपी 3.9 ट्रिलियन डॉलर होता, तर जपानचा 4.1 ट्रिलियन डॉलर होता. भारतीय अर्थव्यवस्थेने इतर प्रमुख अर्थव्यवस्थांना मागे टाकले आहे. जगात भारत सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था राहील असा आयएमएफचा अंदाज आहे.

किती वाढतेय भारत आणि जपानची अर्थव्यवस्था?
आयएमएफने अंदाजानुसार भारतीय अर्थव्यवस्था वाटचाल करत आहे. आयएमएने अंदाज बांधला होता की, 2025 मध्ये भारतीय 6.2% आणि 2026 मध्ये 6.3% दराने वाढेल. याउलट, 2025 मध्ये जपानची अर्थव्यवस्था फक्त 0.6% ने वाढण्याची अपेक्षा आहे. सकल देशांतर्गत उत्पन्नात वाढ आणि ग्राहकांची खरेदीची कुवत वाढत आहे त्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला नवा आयाम मिळत आहे, लोकसंख्येचे बलस्थान हे भारतीय अर्थव्यवस्थेतील महत्वाचा घटक आहे.
2030 पर्यंत भारत 'या' देशाला मागे टाकेल
आयएमएफच्या अंदाजानुसार, 2030 पर्यंत भारताची अर्थव्यवस्था जर्मनीपेक्षा 20% मोठी असेल. भारतीय अर्थव्यवस्था या काळात 6.8 ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचेल. भारतीय अर्थव्यवस्था 2030 पर्यंत जपानपेक्षा 33 टक्क्यांनी पुढे असेल हे आयएमएफने म्हटले आहे तर याचाच संदर्भ देत नीती आयोगाचे सीईओ सुब्रम्हण्यम यांनीही नीती आयोगाच्या प्रशासकीय परिषदेच्या बैठकीत भारत 2030 पर्यंत तिसरी अर्थव्यवस्था होईल असे सांगितले आहे.
पहिल्या, दुसरी आणि तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था कोणत्या देशाची?
भारताने ब्रिटनला मागे टाकत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची किमया साधली आहे. त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्था सुपरफास्ट गतीने पुढे सरकत आहे. आगामी 4 वर्षांत अर्थव्यवस्था 10.1 टक्क्यांनी वाढेल असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)ने वर्तवला आहे. आयएमएफनुसार, सध्या पहिल्या क्रमांकावर अमेरिकेची अर्थव्यवस्था असून दुसऱ्या क्रमांकावर शेजारी राष्ट्र आणि भारताचा स्पर्धक चीन आहे तर तिसऱ्या क्रमांकावर जर्मनीची अर्थव्यवस्था आहे. आता चौथ्या क्रमांकावर भारताच्या अर्थव्यवस्थेने मजल मारली आहे.












Click it and Unblock the Notifications