भारत बनला जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था! जपानला टाकले मागे, तिसऱ्या नंबरवर कधी येणार? वाचा
India has become fourth largest economy in the world : आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकींग न्यूज समोर आली आहे. भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे, भारताने जपानला मागे टाकले असून नीती आयोगाचा अहवालातून ही माहिती समोर आली आहे.
एनआयएने यासंदर्भात वृत्त दिले आहे. भारताने जपानला मागे टाकण्यासोबतच आता 4 ट्रिलियन अमेरिकी डॉलर अर्थव्यवस्थेचे लक्ष्य गाठले आहे. नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ही माहिती दिली आहे.

दहाव्या निती आयोगाच्या बैठकीत माहिती
दहाव्या नीती आयोगाच्या प्रशासकीय परिषद अर्थात गव्हर्निंग कौन्सिल बैठकीनंतर, नीती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रह्मण्यम यांनी माहिती दिली. ते म्हणाले, "भारत अशा टप्प्यावर आहे जिथे तो खूप वेगाने वाढू शकतो, जसे की भूतकाळात अनेक देशांनी केले आहे... हे लक्षात घेता, पुढील 20 ते 25 वर्षांसाठी भारताला प्रत्यक्षात मिळणारा लोकसंख्याशास्त्रीय लाभांश पाहता, आपण वेगाने वाढू शकतो. पंतप्रधानांनी सर्व राज्यांना त्यांच्या पातळीवर व्हिजन डॉक्युमेंट्स तयार करण्याचे आवाहन केले. हे भारताच्या वाढीमध्ये आधीच दिसून येत आहे.
आपण चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहोत - बीव्हीआर सुब्रह्मण्यम
नीती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रह्मण्यम म्हणाले,"मी बोलतोय तशी आपण चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहोत. मी बोलतोय तशी आपली 4 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था आहोत, आणि हा माझा डेटा नाही. हा आयएमएफचा डेटा आहे. आज भारत जपानपेक्षा मोठा आहे."
आता भारताच्या पुढे फक्त 'हे' तीन देश
नीती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रह्मण्यम म्हणाले, " आता भारतापेक्षा अर्थव्यवस्थेत फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनीच मोठे आहेत आणि जर आपल्या धोरण आणि ध्येयावर टिकून राहिलो तर आणखी अडीच ते तीन वर्षांची बाब आहे, आपण तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू. पंतप्रधानांनी हा कॉल करण्याचे कारण म्हणजे हा एक लांब पल्ला आहे आणि आपल्याला हे करावे लागेल.
आयफोन उत्पादनासाठी भारतात स्वस्तात जागा
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत विकले जाणारे अॅपल आयफोन भारतात किंवा इतरत्र नव्हे तर अमेरिकेत उत्पादित केले जातील अशी अपेक्षा व्यक्त केली होती, या ट्रम्प यांच्या अलीकडील विधानावर नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुब्रम्हण्यम यांना प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना सुब्रमण्यम म्हणाले, "दर काय असेल हे अनिश्चित आहे मात्र, गतिशीलता पाहता, आपण उत्पादनासाठी स्वस्त जागा असू."












Click it and Unblock the Notifications