Income Tax Rule: सोने घरात ठेवण्याशी संबंधित नियम काय आहे? काय आहे नियम, घ्या जाणून
Income Tax Rule: भारतीयांना सोन्याविषयी लोकांना प्रचंड आकर्षण आहे. ही काही नवीन बाब नाही. विविध कारणांसाठी आणि विविध निमित्ताने भारतीय नागरिक सोन्याचे दागिने विकत घेत असतात. काही लोक सोन्याची खरेदी वैयक्तिक वापरासाठी म्हणजे दागिन्यांच्या रूपात करतात.

काही जण सोन्याची खरेदी गुंतवणुकीसाठी करतात. वेळप्रसंगी आर्थिक अडचणीच्या काळात किंवा उद्योग-धंद्यात पटकन कर्ज मिळावं म्हणून देखील काही जण सोनं विकत घेतात.
सोनं फक्त गुंतवणूक म्हणूनच नाही तर परंपरा म्हणून देखील खरेदी करतात. म्हणूनच कोणत्याही शुभ प्रसंगी सोनं खरेदी करण्याची परंपरा आहे. महिलांसाठी सोनं हे शृंगाराचे साधनदेखील आहे. भारतात लग्न आणि सणांच्या काळात सोने खरेदी करण्याचा ट्रेंड नेहमीच सुरू असतो. पण तुम्हाला माहितीये का? घरात आपण किती सोनं ठेवू शकतो.
काही लोक सुरक्षेच्या कारणास्तव त्यांचे सोने लॉकरमध्ये ठेवणे पसंत करतात. लॉकरमध्ये ठेवलेले सोने खूप सुरक्षित असते. जर तुम्ही तुमच्या घरात सोने ठेवत असाल तर त्याल एक मर्यादा आहे. हे आपल्या माहिती पाहिजे. तुम्ही जर मर्यादेपेक्षा जास्त सोने ठेवल्यास काय होऊ शकते? याबद्ल माहिती असायला हवी.
तुम्ही घरात किती सोने ठेवू शकता
तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतोय की, जर तुम्हाला सोने खरेदी करण्याची आवड असेल तर तुम्हाला या कायद्याबद्दल माहिती असायला हवी, होय, भारत सरकारच्या आयकर कायद्यानुसार तुम्ही किती सोने घरात ठेवू शकता याची मर्यादा आहे. तुमच्या घरात यानुसार, स्त्री आणि पुरुष दोघांसाठी ही एक वेग-वेगळ्या मर्यादा आहेत.
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्स) नुसार, तुम्ही तुमच्या घरात फक्त विहित मर्यादेतच सोने ठेवू शकता, जर तुम्ही ती मर्यादा ओलांडली, तर तुम्ही हे सोने कोठून खरेदी केले आहे. याबाबत सर्व माहिती द्यावी लागेल आणि त्याच्या पावत्या ही तुमच्या जवळ ठेवाव्या लागतील. जेणेकरुन तुम्ही अडचणीत येणार नाहीत.
पुरुष किती सोने ठेवू शकतो?
भारत सरकारच्या आयकर कायद्यानुसार, पुरुषांना फक्त 100 ग्रॅम सोने ठेवण्याची परवानगी आहे, जर तुम्हाला सोने खरेदी करण्याची शौकीन असेल तर तुम्हाला आयकर कायदा किती सोने ठेवण्याची परवानगी देतो याबद्दल माहिती असायला हवी.
महिला किती सोने ठेवू शकतात
महिलांना सोने खरेदी करणे आणि सोने परिधान करणे खूप आवडते, परंतु तुम्हाला हे माहित असले पाहिजे की, भारत सरकारच्या प्राप्तिकर कायद्यानुसार विवाहित महिला फक्त 500 ग्रॅम सोने घरात ठेवू शकते, तर अविवाहित महिला केवळ 250 ग्रॅम सोने ठेवू शकते. नियमानुसार महिलांना एवढेच सोने ठेवण्याची परवानगी आहे. परंतु महिलांना सोने खरेदी करण्याची खूप आवड असते. पण तुम्ही जर ही मर्यादा ओलांडली तर तुम्हाला संपूर्ण माहिती द्यावी लागेल.
वारशाने मिळालेल्या सोन्यावर कर आकारला जातो
जर तुम्हाला वारसाहक्काने सोने मिळाले असेल तर तुम्हाला त्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही, परंतु जर तुमच्याकडे विहित नियमापेक्षा जास्त सोने असेल तर तुम्हाला त्याची पावती दाखवावी लागेल, जर तुम्ही उत्पन्न घोषित केले असेल किंवा करमुक्त उत्पन्नातून सोने खरेदी केले तर तुम्हाला त्यावर कोणताही कर भरावा लागणार नाही.
सोने विकताना कोणता कर भरावा लागेल
घरात सोने ठेवल्यास कर भरावा लागणार नाही, पण सोने विकण्याचा विचार केल्यास कर भरावा लागेल. एवढेच नाही तर तुम्ही 3 वर्षांपर्यंत सोने तुमच्याकडे ठेवले आणि नंतर ते विकले तर त्यातून होणारा नफा लाँग टर्म कॅपिटल गेन्स (LTCG) वर कर आकारला जाईल. त्याचा दर 20 टक्के आहे.












Click it and Unblock the Notifications