Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ICICI बँकेचा मोठा निर्णय, खात्यात 50 हजार शिल्लक ठेवण्याचा नियम मागे, आता किती बॅलन्स ठेवावे लागणार?

ICICI Bank withdraws Rs 50,000 minimum balance rule : आयसीआयसीआय बँकेने अलीकडेच आपल्या ग्राहकांना जोरदार झटका दिला होता, सेव्हिंग अकाउंटमध्ये किमान शिल्लक 50 हजार रुपये ठेवावे, असा नियम आयसीआयसीआय बँकेने लागू केला होता, मात्र आता या नियमासंदर्भात ग्राहकांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आयसीआयसीआय बँकेने एक पाऊल मागे घेतले आहे आणि मिनिमम बॅलन्स अर्थात शिल्लक रक्कम खात्यात ठेवण्यासंदर्भातचा नियमात सुधारणा केली आहे.

ICICI Bank withdraws Rs 50 000 minimum balance rule

आयसीआयसीआय बँकेने मिनिमम बॅलन्सचा नियम बदलल्यानंतर 1 ऑगस्ट 2025 पासून जे नवीन खातेधारक आहेत किंवा ज्यांना यापुढे नवीन अकाऊंट उघडायचे आहे त्यांना खात्यात 50 हजार रुपये खात्यात शिल्लक राशी म्हणून ठेवणे बंधनकारक करण्यात आले होते, मात्र आता या निर्णयाविरोधात ग्राहकांची प्रतिक्रिया आणि नाराजी समोर आली. त्यामुळे ग्राहकांचे हित लक्षात घेऊन आणि ग्राहकांच्या अपेक्षेनुसार प्राधान्यक्रम ठरवून आयसीआयसीआय बँकेने आपल्या नियमात बदल केला आहे.

Take a Poll

यासंदर्भात एसटी हिंदुस्तान टाइम्सने वृत्त दिले, त्यानुसार, भारताच्या दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी खाजगी बँक असलेल्या आयसीआयसीआयने पन्नास हजार रुपयांचा शिल्लक रक्कम खात्यासंदर्भात नियमाची घोषणा केली होती, मात्र आता या 50 हजार रुपये खात्यात शिल्लक रक्कम किंवा मिनिमिम बॅलन्स म्हणून ठेवण्याच संदर्भातील रक्कम घटविण्यात आली आहे. बँकेने काल 13 जुलै रोजी बुधवारी अधिसूचना जारी केली आणि त्यात असे म्हटले की, "आम्ही १ ऑगस्ट २०२५ पासून उघडलेल्या नवीन बचत खात्यांसाठी मासिक सरासरी शिल्लक ठेवण्याच्या नवीन अटी लागू केल्या होत्या."

आता ग्राहकांना मिनिमम बॅलन्स किती ठेवावे लागणार?

आयसीसीआय बँकेने आता 50 हजार रुपये मिनिमम बॅलन्स ऐवजी 15 हजार रुपये ठेवावे लागतील, असे म्हटले आहे बँकेने हा निर्णय ग्राहकांच्या हितासाठी घेतला आहे.

आता ताज्या नियमानुसार खात्यात किती मिनिमम बॅलन्स/रक्कम ठेवावी लागेल

मेट्रो आणि शहरी ठिकाणे: ₹ 15,000

अर्ध-शहरी ठिकाणे: ₹ 7,500

ग्रामीण ठिकाणे: ₹ 2,500

बँकेने काही विशेष ग्राहक वर्गाला या नियमातून सूट दिली आहे. यात 60 वर्षांपेक्षा कमी वयाचे पेन्शनधारक आणि 1,200 निवडक संस्थांमधील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या ग्राहकांना किमान मासिक सरासरी शिल्लक राखण्याची आवश्यकता राहणार नाही, ज्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+