ह्युंदाई मोटर्स IPO - दीर्घकालाईन गुंतवणुकीची सुवर्णसंधी? एका क्लिकवर जाणून घ्या सर्व माहीती

Hyundai Motor India IPO Open Today: ह्युंदाई मोटर्सचा IPO 15 ऑक्टोबरला गुंतवणुकीसाठी खुला झाला आहे. 17 ऑक्टोबर म्हणजेच गुरुवारपर्यंत या IPO साठी अर्ज करता येईल. IPO साठी कंपनीकडून 1865 ते 1960 रुपयाचा प्राईज बँड निश्चित करण्यात आला आहे. गुंतवणूकदारांना 1 लॉटमध्ये किमान 7 शेअर्स खरेदी करावे लागतील.

शेअर्स एलॉट झाले का नाही, ते आपल्याला 18 ऑक्टोबर रोजी कळेल. शेअर्सचे लिस्टिंग NSE आणि BSE या दोन्ही स्टॉक एक्सचेंजेसवर 22 ऑक्टोबर रोजी होईल. हा IPO पूर्णपणे "ऑफर फॉर सेल" असून, या माध्यमातून ह्युंदाईच्या प्रोमोटर्सला 27870 कोटींचं भांडवल मिळणार आहे. मात्र, कंपनीला हे भांडवल व्यवसायवाढीसाठी वापरता येणार नाही.

hyundai motor Ipo

कर्मचाऱ्यांसाठी डिस्कॉउंट

ह्युंदाईने त्यांच्या कर्मचायांसाठी विशेष डिस्कॉउंट जाहीर केला. ह्युंदाई मोटर्समध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना IPO वर तब्बल 186 रुपये प्रति शेअर एवढा डिस्कॉउंट मिळणार आहे.

ह्युंदाई - जगातली आघाडीची ऑटो कंपनी

ह्युंदाई मोटर्स साऊथ कोरियन ऑटोमोबाईल कंपनी आहे. प्रवासी गाड्यांमध्ये कंपनी जगातली तिसरी सर्वात मोठी कंपनी आहे. कंपनीचा भारतातदेखील मोठा कारभार आहे, भारताच्या प्रवासी गाड्यांच्या विक्रीमध्ये ह्युंदाईचा 15% मार्केट शेअर आहे. 31 मार्च 2024 पर्यंत, कंपनीने भारतात जवळपास 1 कोटी 20 लाख गाड्यांची विक्री केली आहे. I10, I20, क्रेटा, व्हेन्यूसारख्या जवळपास सर्वच मॉडेल्सला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. कंपनीकडे सबंध भारतात 363 डीलर्स आहेत, ज्या माध्यमातून कंपनी गाड्यांची विक्री करते. पेट्रोल आणि डिझेल गाड्यांबरोबर कंपनीने आता इलेक्ट्रिक गाड्यांवर (EV) देखील लक्ष केंद्रित केलं आहे. त्यामुळे, येणाऱ्या काळातदेखील कंपनीची विक्री आणि नफा वाढेल, असा आमचा अंदाज आहे.

आर्थिक कामगिरी आणि व्हॅल्युएशन

ह्युंदाई मोटर्सने भारतात सातत्याने व्यवसाय वाढवला आहे. मागच्या 3 वर्षात, कंपनीच्या विक्री आणि नफ्यामध्ये अनुक्रमे 19% आणि 48% वार्षिक वाढ झाली. 9853 कोटींच्या रिजर्व्हसच्या तुलनेत कंपनीवर सध्या 833 कोटींचं कर्ज आहे. कंपनीने मागच्या काही वर्षात कर्ज कमी केलं आहे. सातत्याने वाढणारी विक्री, नियमित नफा कमावण्यात मिळालेलं यश आणि कमी होणारी कर्जाची पातळी पाहता, कंपनी आर्थिकदृष्ट्या मजबूत आहे, असं म्हणता येईल. व्हॅल्युएशनचा विचार केला तर हा शेअर थोडासा महाग आहे. सध्याच्या वार्षिक नफ्यानुसार, हा शेअर सध्या 26.3 च्या PE रेशिओला उपलब्ध आहे. शेअर्ससाठी मिळणारा "ग्रे मार्केट प्रीमियम" (GMP) बऱ्यापैकी कमी झाला आहे. त्यामुळे, गुंतवणूकदारांनी या IPO मध्ये लिस्टिंग गेनची अपेक्षा न ठेवता, केवळ दीर्घकालावधीसाठी IPO चा विचार करावा.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+