UPI Scam: युपीआय वापरण्या-यांसाठी नवीन संकट, तुमच्यासोबतही होऊ शकतो स्कॅम, असे रहा अलर्ट
UPI Scam : 2016 मध्ये UPI सुरू झाल्यापासून, तो पेमेंटचा सर्वात लोकप्रिय पर्याय बनला आहे. आजच्या डिजिटल युगात प्रत्येकजण युपीआय वापरत आहे. युपीआय वापरणे जितके सोपे आहे तितकेच ते एक समस्याही बनत आहे. युपीआयवर ऑटो पे स्कॅमद्वारे, वापरकर्त्यांना फसवले जात आहे. त्याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला देत आहोतय
युपीआय ऑटो स्कॅममध्ये, फसवणूक करणारे सगळ्यात आधी तुम्हाला सबस्क्रिप्शनसाठी ऑटो पेची विनंती पाठवतात. पण यामध्ये युजरला पाठवलेली रिक्वेस्ट चुकीची असते. अशा परिस्थितीत, युजरला वाटते की ही विनंती कंपनीकडून आली आहे आणि तो स्वीकारतो आणि त्यानंतर युजरच्या खात्यातून पैसे कापले जातात आणि ते फसवणूक करणाऱ्याच्या खात्यात पोहोचतात.

अशा प्रकारे सतर्क रहा (New UPI Scam Alert)
ही फसवणूक टाळण्यासाठी, तुम्हाला योग्य आणि चुकीच्या रिक्वेस्ट्स कशा ओळखायच्या हे माहित असले पाहिजे. फसवणुकीपासून स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी, तुमचा यूपीआय आयडी थेट तुमच्या बँक खात्याशी लिंक करणे टाळा आणि त्याऐवजी पैसे यूपीआय वॉलेटमध्ये ठेवा. याद्वारेच पेमेंट करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचे खाते सुरक्षित राहील. यामुळे तुमच्या बँक खात्यात पैसे सुरक्षित राहतील आणि वॉलेटद्वारे तुमचे पेमेंटचे काम सुरू राहील. तस्चट कोणतीही ऑटो पे रिक्वेस्ट स्वीकारण्यापूर्वी ती तपासून पहा. योग्य आणि अयोग्य यात फरक करणे आवश्यक आहे.
पेमेंटच्या वेळी या गोष्टी लक्षात ठेवा
कोणताही व्यवहार करण्यापूर्वी प्राप्तकर्त्याचे नाव आणि व्हर्च्युअल पेमेंट पत्ता (VPA) दोनदा तपासा. नंतर स्कॅमर तुमची फसवणूक करण्यासाठी वैध कंपन्यांसारखी नावे असलेली खाती तयार करतात. अशा वेळी थोडी सावधगिरी बाळगल्यास आर्थिक नुकसान होण्यापासून वाचू शकते. याशिवाय, युपीआय पिन कोणासोबतही शेअर करू नका, अगदी बँक किंवा ग्राहक सेवा प्रतिनिधीसोबतही तुमचा वन-टाइम पासवर्ड म्हणजेच ओटीपी शेएर करु नका.
युपीआयशी संबंधित फसवणूक का वाढत आहे?
युपीआय आयडी हा सहसा मोबाईल नंबर आणि UPI प्रदाता यांचे एक्सटेंशन असते. याचा फायदा फसवणूक करणारे घेतात. तुम्ही अनेकदा ई-शॉपिंग, रेस्टॉरंट, मॉल्स, पार्किंग लॉट इत्यादी ठिकाणी मोबाईल नंबरची माहिती शेअर करता, यामुळे, युपीआय आयडी क्रॅक करून फसवणूक केली जाते.
अशीही होते फसवणूक
आजकाल अनेक बनावट युपीआय ॲप्स आले आहेत. गुगल प्ले स्टोअरवर असे ॲप्स देखील आहेत ज्यामध्ये ट्राझेंक्शन सक्सेसफूलचा स्क्रीनशॉट सहजपणे तयार केला जाऊ शकतो. अशा ॲप्समध्ये, गो टू फेक पेचे एकपेज दिसते, ज्यावर क्लिक केल्यावर रिसिव्हरचा तपशील प्रविष्ट करण्याचा पर्याय येतो. हे लोक नावाचा तपशील देतात आणि रक्कम टाकतात. एवढेच नाही तर तारीख आणि वेळही त्यात टाकण्यात टाकतात.
ही प्रोसेस केल्यानंतरएक सक्सेसफूल ट्राझेंक्शन पेज तयार केले जाते.जे अगदी ख-या पेज सारखे दिसते आणि अशा प्रकारे ते युजरची फसवणूक करतात. सर्व माहिती खरी असल्याचे दिसून येत असल्याने, आपल्यासोबत काही स्कॅम होत असल्याची थोडी देखील शंका येत नाही.












Click it and Unblock the Notifications