1 वर्ष मोफत इंटरनेट कसे मिळवायचे?, जिओने दिली खास दिवाळीनिमित्त ऑफर, वाचा सविस्तर

Jio Diwali Dhamaka offer : दिवाळी सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे. एकमेकांना मिठाई देऊन शुभेच्छा देत स्नेहीजणांना लोक भेटत असतात. घरातील मोठे लोक कुटुंबातील छोट्यांना दिवाळीनिमित्त खास भेट देखील देत असतात. अशातच जिओ युझर्संना देखील जिओ कंपनीचे मालक मुकेश अंबानी यांनी देखील दिवाळीनिमित्त खास ऑफर दिली आहे.

देशातील प्रसिद्ध टेलिकॉम कंपन्यांपैकी एक असलेल्या रिलायन्स जिओनेही दिवाळीनिमित्त आपल्या ग्राहकांना खास भेट दिली आहे. सणासुदीच्या सीझन डील्स अंतर्गत Jio कडून कोणते विशेष ऑफर केले जात आहे, याबाबत आपण जाणून घेऊया...!

Jio Diwali Dhamaka offer

जिओ यूजर्सला मोफत इंटरनेट सुविधा

इंटरनेटचा आनंद घेण्यासाठी आणि अनुभव देण्यासाठी, Jio तर्फे खास दिवाळी धमाका ऑफर दिली जात आहे. या ऑफर अंतर्गत ग्राहकांना रोजच्या डेटाचा आनंद घेता येणार आहे. अमर्यादित 5G डेटासोबतच ग्राहकांना हाय-स्पीड इंटरनेट सुविधाही मिळणार आहे.

1 वर्ष मोफत इंटरनेट कसे मिळवायचे?

Jio च्या दिवाळी ऑफर अंतर्गत ग्राहकांना 1 वर्षासाठी मोफत इंटरनेट मिळत आहे. मात्र, या सुविधेसाठी ग्राहकाला 20 हजार रुपयांपर्यंतची खरेदी करावी लागणार आहे. वास्तविक, जिओच्या दिवाळी ऑफरमध्ये ग्राहकांनी माय स्टोअरमधून 20,000 रुपयांची खरेदी केल्यास त्यांना 1 वर्षासाठी मोफत इंटरनेट सेवा दिली जाईल.

Jio दिवाळी ऑफरचा लाभ कधी मिळणार?

काही रिपोर्ट्सनुसार, 1 वर्षासाठी मोफत इंटरनेट सेवेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना 3 नोव्हेंबरपूर्वी माय स्टोअरमधून खरेदी करावी लागेल. येथून खरेदी करून तुम्ही Jio चे इंटरनेट एका वर्षासाठी मोफत वापरू शकता.

एअर फायबर योजनेनवर काय ऑफर

जिओ दिवाळी धमाका ऑफर अंतर्गत एअर फायबर प्लॅन देखील दिला जात आहे. ग्राहकांना इतर कोणतेही शुल्क न घेता 3 महिन्यांसाठी पॅकेज दिले जाईल. याशिवाय नवीन ग्राहकांना मोफत इंटरनेट सुविधाही दिली जाणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+