Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

कमी पगारातही व्हा करोडपती! कुठे व कशी करायची गुंतवणूक, जाणून घ्या संपूर्ण गणित!

SIP investment for crorepati : आजच्या काळात प्रत्येकाला आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हायचे आहे आणि भविष्यात करोडपती होण्याचे स्वप्न आहे. अनेकदा लोकांना असे वाटते की हे फक्त जास्त पगार असणाऱ्या लोकांसाठीच शक्य आहे. पण हे पूर्णपणे चुकीचे आहे. जर तुमचा पगार केवळ २०,००० रुपये असला तरीही योग्य नियोजन आणि शिस्तबद्ध गुंतवणुकीने तुम्ही करोडपती बनू शकता.

Low Salary SIP Investment

लहान गुंतवणूक, मोठा परतावा: चक्रवाढीची जादू

कमी उत्पन्न असल्याने अनेक लोक बचत आणि गुंतवणूक पुढे ढकलतात. मात्र, गुंतवणुकीत सातत्य आणि वेळ हे दोन सर्वात महत्त्वाचे घटक आहेत. जर तुम्ही तुमच्या मासिक पगारातून एक छोटासा हिस्सा नियमितपणे गुंतवला, तर चक्रवाढीच्या जादूने तुमचे पैसे अनेक पटींनी वाढू शकतात.

उदाहरणादाखल, समजा तुम्ही दरमहा फक्त ४,००० रुपये सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन (SIP) मध्ये गुंतवले आणि वार्षिक १०% परतावा मिळवला, तर २२ वर्षांत तुमची एकूण गुंतवणूक सुमारे ३४ लाख रुपये होईल. पण त्यावर मिळणारा परतावा १ कोटी रुपयांपेक्षा जास्त असेल. हेच गुंतवणुकीचे खरे सामर्थ्य आहे.

आर्थिक नियोजनासाठी हे सूत्र महत्त्वाचे!

कमी उत्पन्न असलेल्या लोकांसाठी खर्चाचे योग्य नियोजन करण्यासाठी ५०:३०:२० हा नियम सर्वोत्तम मानला जातो.

  • ५०% - आवश्यक खर्च (उदा. घरभाडे, ईएमआय, मुलांचे शिक्षण).
  • ३०% - जीवनशैलीवर खर्च (उदा. खरेदी, प्रवास, मनोरंजन).
  • २०% - बचत आणि गुंतवणूक (उदा. एसआयपी, एफडी, पीपीएफ).

या सूत्राचा वापर करून तुम्ही तुमचे खर्च नियंत्रित करू शकता आणि गुंतवणुकीसाठी नियमितपणे पैसे बाजूला ठेवू शकता.

स्टेप-अप एसआयपी : करोडपती होण्याचा त्वरीत मार्ग?

तुमच्या पगाराचा मोठा भाग दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांसाठी गुंतवणे महत्त्वाचे आहे. मासिक पगाराच्या १५-२०% रक्कम नियमितपणे गुंतवल्यास लवकर ध्येय गाठता येते.

जर तुम्ही दरमहा ४,००० रुपयांची SIP सुरू केली आणि दरवर्षी त्यात फक्त ५% वाढ करत गेलात, तर तुम्ही अंदाजे २५ वर्षांत (३०१ महिन्यांत) तुमचे १ कोटी रुपयांचे ध्येय गाठू शकता. यालाच स्टेप-अप एसआयपी म्हणतात.

हे असे काम करते!

  • पहिल्या वर्षी तुम्ही दरमहा ४,००० रुपये गुंतवाल.
  • दुसऱ्या वर्षी दरमहा ४,२०० रुपये (५% वाढ).
  • तिसऱ्या वर्षी दरमहा ४,४१० रुपये (पुन्हा ५% वाढ).

तुमच्या गुंतवणुकीची रक्कम जसजशी वाढत जाईल, तसतसा 1 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ कमी होईल. यामुळे तुम्ही कमी पगारातही योग्य नियोजनाने करोडपती बनण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. त्यामुळे आजच एक लहानशी सुरुवात करा आणि तुमच्या भविष्यासाठी आर्थिक पाया मजबूत करा.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+