बोनस देण्याची भन्नाट पद्धत! टेबलवर 48 कोटी ठेवले, कर्मचाऱ्यांना म्हटले-जेवढे पैसे घ्यायचे तेवढे घ्या
Henan Mining Company Bonus Distribution : सध्या नोकरदार वर्ग अनेक समस्यांच्या गर्तेत आहे. एकीकडे कंपन्यात भरमसाठ काम आणि तुलनेत कामाचा योग्य मोबदला कमी अशा स्थितीत कामाचा तणावही असतो. हेच काय अंतर्गत राजकारण तर वेगळेच पण अशा अनेक संकटांतही सर्वच नोकरदार आपली नोकरी प्रामाणिकपणे आणि नेटाने करतात.
कंपन्यांच्या बाबतीत सध्याच्या घडीला चांगले बोलले जात नसले तरीही काही कंपन्या आपल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे हित जोपासतात. सध्या अशाच एका कंपनीची उद्योग जगतात चर्चा आहे.

बोनस म्हणून वाटले 48 कोटी रुपये!
'आज तक' च्या वृत्तानुसार, हेनान माईनिंग क्रेन लिमिडेट नावाची कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी भेट दिली आहे. टेबलावर 40 मिलियन म्हणजेच जवळपास 48 कोटी रुपये पसरवून ठेवले. या नोटा बोनस म्हणून देण्यात येणार होत्या. कंपनीने म्हटले की, जेवढे मोजता येतील हवी तेवढी रक्कम बोनस म्हणून घरी घेऊन जा. अशा पद्धतीने या कंपनीने बोनस वाटला. यापद्धतीने कर्मचाऱ्यांना हवा तेवढा बोनस देऊन केलेल्या अफलातून कामगिरीमुळे कंपनी चांगलीच चर्चेत आली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल
एका रिपोर्टनुसार, हेनान मायनिंग या कंपनीतर्फे आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस देण्याची ही लयभारी पद्धतीचा सोशल मीडियावर बोलबाला सुरु आहे आणि ही गोष्ट व्हायरल होत आहे.
15 मिनिटांची वेळ
क्रन कंपनीने जवळपास 70 मीटर अंतरात चायनीज करन्सी पसरवून टाकली. त्यानंतर आपल्या कर्मचाऱ्यांना 15 मिनिटांचा वेळ दिला. या पंधरा मिनिटांत जेवढी रक्कम हवी तेवढी घ्या असे सांगण्यात आले. कंपनीने या पद्धतीने 25 जानेवारीला बोनसचे वाटप केले. कंपनीच्या या चांगल्या कामामुळे कर्मचारी खूश झाले नसतील तर नवलचं.












Click it and Unblock the Notifications