Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gudi Padwa 2025 : गुढीपाडव्याला सोनं का खरेदी करतात?, यंदा सोनं खरेदीचा मुहूर्त काय, वाचा सविस्तर

Gudi Padwa 2025 : गुढी पाडवा हा एक अत्यंत महत्वाचा सण आहे. कारण गुढी पाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्षाची सुरुवात होत असते. या दिवशी घरामध्ये नवीन वस्तूची खरेदी करणे, भेटवस्तू देणे यासोबतच सोनं खरेदी करण्यालाही अनन्य साधारण महत्त्व आहे.

गुढी पाडव्याच्या दिवशी घराघरांमध्ये गुढी उभारली जाते आणि तिचं मनोभावे पूजन केलं जातं. यासोबतच घरामध्ये नवीन वस्तू घेण्यासाठीही हा दिवस शुभ मानला जातो. यासोबतच सोनं खरेदीसाठीही हा दिवस शुभ मानला जातो.

Gudi Padwa 2025

गुढी पाडव्याला सोनं खरेदी का केली जाते?

भारतातील विविध भागात किंवा राज्यांमध्ये उगादी हा नवीन वर्षाचा दिवस म्हणून साजरा केला जातो. याव्यतिरिक्त, तो ओणम , वैशाखी, गुढी पाडवा इत्यादी म्हणून देखील ओळखला जातो. ओणम हा तेलुगू किंवा कन्नड नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो तर गुढी पाडवा हा मराठी नवीन वर्ष म्हणून साजरा केला जातो.

भारतात, सोने खरेदी करणे हे केवळ आर्थिक गुंतवणूक म्हणून पाहिले जात नाही तर एक सांस्कृतिक प्रथा म्हणून देखील पाहिले जाते. या शुभ दिवशी सोने खरेदी करण्याशी पवित्रता आणि संपत्तीचा संबंध आहे. लोकांचा असा विश्वास आहे की या शुभ दिवशी सोने खरेदी केल्याने वर्षभर आशीर्वाद आणि यश मिळते. ही सांस्कृतिक परंपरा नवीन सुरुवातीच्या आनंदाशी सुसंगत आहे

सराफा बाजारात मिळतात विविध ऑफर्स?

गुढी पाडव्याच्या दिवशी नवीन वस्तू खरेदी केली किंवा मग गुंतवणूक केली तर हे खूप लाभदायक असतं असही ज्योतिषी मानतात. या दिवशी मोठ्या प्रमाणात सोन्याची खरेदी होत असल्यामुळे सराफा बाजारामध्ये ग्राहकांना विविध ऑफर्स दिल्या जातात.

काही लोक हे आवड म्हणून सोनं खरेदी करतात. तर काही लोक हे गुंतवणुकीचा विचार करुन सोनं खरेदी करत असतात. या हिंदू नववर्षामध्ये नात्यामधील गोडवा वाढवण्यासाठी अनेकजण हे सोन्याची किंवा चांदीची वस्तू देखील एकमेकांना भेट देतात.

सोनं खरेदी करण्यासाठी सण हे निमित्त असतं. या निमित्ताने तुमची उत्तम गुंतवणूकही होते. बहुदा याच विचाराने सोनं किंवा दागिने खरेदी करण्याला विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आता दागिन्यांचा ट्रेंड बदलला आहे. तुम्ही विविध मार्गांनी सोनं खरेदी करु शकता.

सध्याच्या काळात दागिन्यांसोबतच डिजिटल गोल्डमध्येही गुंतवणूक केली जाऊ शकते. यासोबतच 1 ग्रॅम 24 कॅरेटचा कॉईनही आता आपण खरेदी करु शकतो. तसंच दागिने खरेदी करताना विशेष काळजी घेणंही महत्त्वाचं असतं.

सद्यस्थितीत सोन्याचे भाव काय?

दिवसेंदिवस सोन्याचे दर उच्चांक गाठत आहेत. गुढीपाडव्याच्या तोंडावर नऊ दिवसांपूर्वी 19 मार्चचा 89,200 (जीएसटी वगळून) दर होता. शुक्रवारी हा उच्चांक मोडीत काढून 800 रुपयांची वाढ झाली. आता प्रतितोळ्याचे दर 89,700 (जीएसटीसह 92,391) रुपयांवर पोहोचले. चांदीच्या दरातही 1 हजार रुपयांची वाढ होऊन भाव प्रतिकिलो 1 लाख 2 हजार रुपयांवर गेला आहे.

अमेरिकेचेे नवे व्यापार कर धाेरण, इतर देशांच्या बँकांकडून सोन्याची वाढतर खरेदी दरवाढीस कारणीभूत ठरली आहे. मार्चअखेरपर्यंत दाेन हजार रुपयांची वाढीचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला हाेता. मात्र, प्रत्यक्षात अखेरच्या आठवड्यात 1400 रुपयांची वाढ नाेंदली गेली.

साेमवारी 88,300 रुपये ताेळा असलेले साेने शुक्रवारी 89,700 वर पाेहचले. गुढीपाडव्यानंतर तेजी थंडावून दर स्थिर राहण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय साेने बाजाराचे अभ्यासक आदित्य नवलखा यांनी व्यक्त केला आहे.

सोन्यासह या वस्तू देखील लोक करतात खरेदी

गाडी किंवा घर

नवीन गाडी किंवा नवीन घर खरेदी करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. या दिवशी केलेली मोठी गुंतवणूक आर्थिक उन्नतीस मदत करते असे मानले जाते.

धान्य आणि अन्नधान्य

नवीन वर्षाच्या सुरुवातीला तांदूळ, गहू, डाळी आणि इतर धान्य खरेदी करणे घरात समृद्धी टिकवते आणि अन्नसाठा टिकून राहण्याचे अश्वासन देते, असे मानले जाते.

गोड पदार्थ

कोणत्याही सण गोड पदार्थांशिवाय पूर्ण होत नाही. गुढीपाडव्याच्या दिवशी गोड खरेदी करणे आणि ते वाटणे शुभमानले जाते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+