स्वंयपाक घरातील आवश्यक वस्तू डेली युज, अन्नपदार्थ २२ सप्टेंबरपासून स्वस्त गृहीणींना मोठा दिलासा
GST rate changes list : देशातील नागरिकांसाठी मोठी बातमी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे, त्यानुसार दिल्लीत 3 आणि 4 सप्टेंबर 2025 रोजी जीएसटी परिषदेची 56 वी बैठक पार पडली. या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. जीएसटी कररचनेत मोठे बदल करुन चार ऐवजी दोनच स्लॅब तयार करण्यात आले आहेत, त्यात ५ आणि १८ टक्क्यांचा स्लॅब आहे, तर एक ४० टक्क्यांचा तिसरा स्लॅब आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरुन स्वातंत्र्यदिनी आधीच कल्पना दिली, त्यानुसार, आता जीएसटी कररचनेत पुर्णतः बदल झाले आहेत, फक्त या निर्णयांची अमंलबजावणी येत्या २२ सप्टेंबरपासून होणार आहे. त्यामुळे आता अवघ्या १३ दिवसांतच महागाईचा निर्देशांक थोड्याअंशी कमी होणार आहे. म्हणजेच तुमच्या खिशाला बसणारी झळ थांबू शकते. यातून तुमच्या घरातील वस्तूंवर मोठा परिणाम होणार असून या वस्तू तुम्हाला स्वस्तात मिळणार आहेत.
22 सप्टेंबरपासून दिलासा
बिस्किटे, व्हेपर्स, चिवडा, कॉफी, चीज आणि दूध यासारख्या स्वयंपाकघरातील वस्तूंच्या दरांमध्ये बदल होऊ शकतो.
नवीन जीएसटी दरांमध्ये, अनेक खाद्यपदार्थांवरील कर दर १२ टक्क्यांवरून ५ टक्के करण्यात आला आहे. आता सामान्य ग्राहकांना आशा आहे की यामुळे महागाईतून निश्चितच काही प्रमाणात दिलासा मिळेल. दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होतील आणि महिलांना बजेटमध्ये घर चालवणे शक्य होईल. जाणून घ्या कोणत्या स्वयंपाकघरातील वस्तूंच्या किमती कमी करता येतील.
"GST बदलानंतर किचनमधील या वस्तू स्वस्त
जीएसटी कौन्सिलने दरांमध्ये बदल करून सामान्य जनतेला मोठा दिलासा दिला आहे. या नव्या अपडेटनंतर, खाण्यापिण्यासह रोजच्या वापरातील अनेक गोष्टी स्वस्त झाल्या आहेत. मात्र, साखरेचे प्रमाण असलेल्या पेयांवरील (शुगरी ड्रिंक्स) कर वाढवण्यात आला आहे. कोणत्या वस्तूंचा कर घटला किंवा वाढला, ते जाणून घेऊया.
स्वस्त होणाऱ्या वस्तू
- किचनच्या आणि घरगुती आवश्यक वस्तूंवरचा जीएसटी १८% वरून ५% झाला आहे.
- खाद्यपदार्थाचा विचार केला तर चॉकलेट, बिस्किटे, कॉर्नफ्लेक्स, कॉफी आणि आईस्क्रीम.
- वैयक्तिक वापराच्या वस्तूंचा विचार केला तर हेअर ऑईल, शॅम्पू, साबण, शेव्हिंग क्रीम आणि टूथपेस्ट.
- इतरमध्ये बाटलीबंद पाणी स्वस्त होईल.याव्यतिरिक्त, खालील डेअरी आणि स्नॅक्स वस्तूंवरचा जीएसटी १२% वरून ५% करण्यात आला आहे.
- लोणी (बटर)
- पनीर
- मिठाई
- नमकीन स्नॅक्स
'या' साखरमिश्रीत पेयांवर कर वाढला
साखरेचे प्रमाण असलेल्या पेयांवरील जीएसटी २८% वरून ४०% करण्यात आला आहे. म्हणजेच या वस्तू खरेदी करताना खिशाला झळ बसेल आणि मुद्दामहून या वस्तूवर सीन जीएसटी लावण्यात आली आहे, कारण या वस्तूंचे खासकरुन लोकांनी सेवन करु नये त्या आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक असतात, हा यामागील हेतू असतो. सरकारच्या या निर्णयामुळे सामान्य नागरिकांवरील दैनंदिन खर्चाचा भार कमी होईल, तर साखरेचे प्रमाण असलेल्या पेयांचे दर वाढल्यामुळे त्यांच्या वापरावर परिणाम होऊ शकतो.












Click it and Unblock the Notifications