फायद्याची बातमी: Google ने भारतात लाँच केले पहिले क्रेडिट कार्ड! UPI वर उपलब्ध, जाणून घ्या फायदे
Google pay launches first flex credit card india : "खिशात फिजिकल क्रेडिट कार्ड ठेवण्याचे दिवस आता संपले आहेत! गूगलने भारतात अशा एका क्रेडिट कार्डचे अनावरण केले आहे, जे थेट तुमच्या UPI शी लिंक होईल. 'फ्लेक्स बाय गूगल पे' मुळे आता ग्राहकांना क्यूआर कोड स्कॅन करून क्रेडिट मर्यादेतून पैसे खर्च करता येतील. केवळ डिजिटल सुविधाच नाही, तर प्रत्येक ट्रान्झॅक्शनवर 'इन्स्टंट रिवॉर्ड्स' देणारे हे कार्ड नेमकं कसं मिळवायचं आणि याचे खास फीचर्स काय आहेत? वाचा ही खास बातमी..."

गुड रिटर्न्सनुसार, डिजिटल पेमेंट क्षेत्रात क्रांती गुगलने आणली, यानंतर आता Google ने बँकिंग क्षेत्रात चांगलीच झेप घेतली आहे. गूगलने 'फ्लेक्स बाय गूगल पे' हे भारतात लाँच केलेलेले आपले पहिले जागतिक क्रेडिट कार्ड आहे. विशेष म्हणजे, गूगलने या सुविधेसाठी भारताची निवड सर्वात आधी केली असून, Axis Bank सोबत भागीदारी केली आहे.
'फ्लेक्स बाय गूगल पे'ची वैशिष्ट्ये आणि फायदे
UPI शी थेट जोडणी: हे कार्ड NPCI च्या 'रुपये' नेटवर्कवर चालते, त्यामुळे तुम्ही ते तुमच्या Google Pay UPI शी लिंक करून कोणत्याही व्यापाऱ्याला स्कॅन करून पेमेंट करू शकता.
इन्स्टंट रिवॉर्ड्स मिळणार
इतर कार्ड्सप्रमाणे महिन्याच्या शेवटी नाही, तर प्रत्येक व्यवहारावर तुम्हाला लगेच रिवॉर्ड्स किंवा कॅशबॅक मिळेल, जो तुम्ही पुढच्या खरेदीसाठी त्वरित वापरू शकता. फिजिकल कार्डची गरज संपली असून हे पूर्णपणे डिजिटल कार्ड असून, साध्या UPI पेमेंटसारखेच वापरता येते.
कार्ड कसे मिळवायचे?
क्रेडिट कार्ड सविधेसाठी कोणत्याही बँकेत न जाता किंवा कागदपत्रे जमा न करता, काही मिनिटांत ऑनलाइन अर्ज करून तुम्ही हे कार्ड मिळवू शकणार आहात.
कार्डसाठी अर्ज कसा करायचा?
गूगलने ही प्रक्रिया अत्यंत सोपी ठेवली आहे. युजर्सना Google Pay ॲपमध्येच या कार्डसाठी अर्ज करण्याचा पर्याय मिळेल. तुमची पात्रता तपासल्यानंतर काही मिनिटांतच कार्डला अप्रूवल मिळेल आणि तुम्ही तुमची 'क्रेडिट लिमिट' वापरण्यास सुरुवात करू शकाल.
(Disclaimer : क्रेडिट कार्डचा वापर जबाबदारीने करावा. अर्जापूर्वी नियम आणि अटी (T&C) काळजीपूर्वक वाचाव्यात.)












Click it and Unblock the Notifications