तुमचा फोन तुमचे संभाषण ऐकत आहे का? त्वरित बदला तुमच्या फोनमधील या सेटिंग्ज, सोपी आहे प्रोसेस
Google Privacy Setting: आजच्या काळात आपला फोन हा आपला सर्वात विश्वासू साथीदार आहे. कारण आपले सर्व महत्त्वाचे कॉन्टेक्ट, बँकिंग तपशील आणि कधीकधी संपूर्ण माहिती त्यात साठवली जाते. याशिवाय, आपण आपला फोन दैनंदिन ब्राउझिंग आणि इतर माहीतीची देवाण घेवाण करण्यासाठी वापरतो. पण तुम्ही कधी लक्षात घेतले आहे का की, एखाद्या उत्पादनाबद्दल किंवा विषयावर बोलल्यानंतर तुम्हाला अचानक तुमच्या फोनवर त्याच्याशी संबंधित जाहिराती कश्या दिसू लागतात?
जर तुमच्यासोबत असे काही घडतं असेल तर तो योगायोग नाही. अनेक अँड्रॉइड यूजर्स नकळतपणे गुगलला त्यांच्या मायक्रोफोन, लोकेशन आणि इतर वैयक्तिक डेटाचा अॅक्सेस देतात, जो जाहिरातींसाठी वापरला जातो. अशा परिस्थितीत जर तुम्हीही असे काही केले तर तुमची माहिती गुगलपर्यंत पोहोचू शकते.

गुगल तुमचे संभाषण ऐकते का?
आपल्याला माहिती आहेच की, प्रत्येक अँड्रॉइड फोन यूजर्सला त्याच्या सेवा वापरण्यासाठी गुगल अकाउंटने साइन इन करणे आवश्यक आहे. म्हणून जेव्हा यूजर्स अॅप्स इन्स्टॉल करतात तेव्हा ते अनेकदा लक्ष न देता कॅमेरा,संपर्क,लोकेशन आणि मायक्रोफोनला परवानग्या देतात.
यामुळे कधीकधी Google सर्व्हिस डीफॉल्टनुसार चालू राहतात, ज्यामुळे त्यांना डेटा गोळा करण्याची परवानगी मिळते. तुमचा फोन मायक्रोफोन अॅक्सेस करू शकतो, ज्यामुळे Google तुमचे संभाषण ऐकू शकते. तुमचा डेटा वैयक्तिकृत जाहिरातींसाठी वापरला जातो.
गुगलला मायक्रोफोन वापरण्यापासून कसे थांबवायचे?
जर तुम्हाला गुगलने तुमच्या फोनवरून तुमचे संभाषण रेकॉर्ड करू नये असे वाटत असेल, तर तुम्हाला या स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.
- सर्वप्रथम तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनवर सेटिंग्ज उघडा.
- आता खाली स्क्रोल करा आणि Google Settings वर टॅप करा.
- यानंतर Manage Your Google Account वर जा.
- आता Data & Privacy विभागात जा.
- यानंतर Web & App Activity चा पर्याय मिळेल. त्यावर टॅप करा आणि पुढील पेजवर जा
- आता Include Audio and Video Activity पर्याय शोधा आणि तो अनचेक करा.
- शेवटी Terms of Service स्वीकारा.
सेटिंग बंद केल्यानंतर काय होते?
हे सेटिंग बंद केल्यानंतर Google ला तुमच्या मायक्रोफोनचा अॅक्सेस राहणार नाही, ज्यामुळे तुमचे खाजगी संभाषण सुरक्षित राहील. तुम्ही अलीकडे ज्या विषयांशी संवाद साधला आहे त्यांच्याशी संबंधित जाहिराती तुम्हाला दिसणार नाहीत.
तुमचा डेटा सुरक्षित राहील, ज्यामुळे ट्रॅकिंग आणि गैरवापराची शक्यता कमी होईल.












Click it and Unblock the Notifications