Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सोनं की SIP? दरमहा 5 हजारांची गुंतवणूक; 15 वर्षांत कोण बनवणार 'खरंच' श्रीमंत? पाहा संपूर्ण हिशोब!

Gold Vs SIP : सोन्याच्या दरात अलीकडे झालेली विक्रमी वाढ असो, वा म्युच्युअल फंड एसआयपी (SIP) मध्ये मिळणारा संभाव्य दमदार परतावा... गुंतवणूकदारांसमोर नेहमीच प्रश्न असतो की, दीर्घकाळात खरी संपत्ती कोण निर्माण करेल? तुम्ही जर दरमहा फक्त ₹५,००० ची गुंतवणूक करून १५ वर्षांसाठी आर्थिक नियोजन करत असाल, तर सोन्यात जास्त फायदा होईल की म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये? गुंतवणुकीच्या या दोन लोकप्रिय पर्यायांचा सविस्तर हिशोब आणि तज्ज्ञांचे विश्लेषण वाचा, ज्यामुळे तुमच्यासाठी सर्वाधिक नफा देणारा पर्याय निवडणे सोपे होईल!

Gold Vs SIP    5000 Monthly Investment Calculation

गेल्या काही आठवड्यांपासून सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे, तर दुसरीकडे म्युच्युअल फंड एसआयपीमध्ये दीर्घकाळात सर्वाधिक परतावा मिळण्याची क्षमता मानली जाते. अशा परिस्थितीत, जर एखाद्या गुंतवणूकदाराला सोनं आणि एसआयपी यापैकी एकाची निवड करायची असेल, तर तो गोंधळून जाऊ शकतो. गुंतवणूक कालावधी, बाजाराची स्थिती आणि तज्ञांचे मत यांसारख्या घटकांवर दोघांची तुलना करणे महत्त्वाचे ठरते.

सोनं, म्युच्युअल फंड आणि मुदत ठेव -एफडी हे गुंतवणूक पर्याय लोकप्रिय असले तरी, फक्त ₹५,००० प्रति महिना गुंतवून, १५ वर्षांच्या कालावधीनंतर सोन्यातून अधिक फायदा होतो की एसआयपीतून, याचा सविस्तर ताळमेळ खालीलप्रमाणे देत आहोत, ज्यामुळे तुमच्यासाठी योग्य निवड करणे सोपे होईल.

सोनं vs म्युच्युअल फंड SIP: गुंतवणूक निवडण्याचा निकष

विविध गुंतवणूक पर्यायांचे स्वतःचे धोके आणि फायदे असतात. तज्ञांच्या मते, शॉर्ट टर्मसाठी (कमी कालावधीसाठी) जास्त अस्थिर असलेले इक्विटी-संबंधित उत्पादने योग्य नसतात. अशा वेळी हायब्रिड फंड किंवा मुदत ठेव निवडणे चांगले ठरते.

दीर्घकालीन गुंतवणूक : १५ वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीसाठी गुंतवणूक करताना, इक्विटी किंवा सोने हे दोन्ही पर्याय चांगले मानले जातात, कारण ते अधिक परतावा देऊ शकतात आणि दीर्घ काळात धोका कमी करतात.

सुरक्षितता : जोखीम टाळणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी सोने हा अत्यंत पसंतीचा पर्याय आहे, कारण ते अधिक सुरक्षित मानले जाते आणि यात वार्षिक १० ते १५% परतावा मिळण्याची अपेक्षा असते.

परताव्याची शक्यता : इक्विटी म्युच्युअल फंडात काहीवेळा असामान्य परतावा मिळण्याची शक्यता असते, जो FD पेक्षा दुप्पट किंवा त्याहून अधिक असू शकतो.

१५ वर्षांसाठी मासिक ₹५,००० गुंतवणुकीचा हिशोब

येथे सोन्यात अपेक्षित सरासरी १०% परतावा आणि म्युच्युअल फंड (SIP) मध्ये १२% अपेक्षित परतावा गृहीत धरून आकडेमोड केली आहे.

घटकम्युच्युअल फंडसोने
गुंतवणूक कालावधी १५ वर्ष १५ वर्ष
मासिक एसआयपी/गुंतवणूक ५ हजार ५ हजार
अपेक्षित परतावा दर १२ टक्के १० टक्के
एकूण गुंतवलेली रक्कम ९ लाख ९ लाख
अंदाजित परतावा (रिटर्न) १६ लाख २२ हजार ८७९ ११ लाख ८९ हजार ६२१
१५ वर्षानंतरची एकूण किंमत ₹२५ लाख २२ हजार ८७९ २० लाख ८९ हजार ६२१

निष्कर्ष काय समजायचा?

एकूणच वर दिलेल्या रकान्यातील गणनेनुसार, जर अपेक्षित परताव्याचे दर कायम राहिले तर, म्युच्युअल फंड एसआयपी मध्ये १५ वर्षांनंतर सोन्याच्या तुलनेत ₹४,३३,२५८ जास्त फायदा मिळण्याची शक्यता आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+