Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

घरात किती सोने ठेऊ शकतो? धनत्रयोदशी-दिवाळीच्या मुहूर्तावर सोनं खरेदी करण्यापूर्वी हा नियम नक्की वाचा

Gold storage limit india income tax rules : सोने! भारतीयांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग. मग ती धनत्रयोदशीची खरेदी असो, दिवाळीचा शुभमुहूर्त असो, किंवा लग्नसमारंभातील गुंतवणूक. सोने खरेदीचा ओढा भारतीयांमध्ये, विशेषतः महिलांमध्ये, नेहमीच जास्त असतो. यामुळे अनेक घरांमध्ये वर्षानुवर्षे मोठ्या प्रमाणात सोन्याचा साठा जमा होतो.

परंतु, तुम्हाला माहिती आहे का? घरात किती सोने ठेवण्याची कायदेशीर परवानगी आहे, याची एक निश्चित मर्यादा आहे! जर तुमच्याकडे ठरलेल्या मर्यादेपेक्षा अधिक अनधिकृत सोने आढळले, तर ते 'गैरकानूनी' ठरून त्यासाठी मोठा दंड भरावा लागू शकतो. याच पार्श्वभूमीवर, प्राप्तिकर विभाग काय सांगतो, ते पाहूया.

Gold storage limit

घरात किती सोने ठेवू शकतो?

गुड रिटर्नने यासंदर्भात वृत्त दिले आहे. त्यात त्यांनी प्राप्तिकर विभागाच्या नियमांचा दाखला दिला आहे. प्राप्तिकर विभागाच्या नियमांनुसार, घरात सोने ठेवण्यावर तशी कोणतीही 'किलो'मध्ये सरकारी मर्यादा नाही. पण एक अट महत्त्वाची आहे की, तुमच्याकडे असलेल्या सोन्याचा 'स्रोत' तुम्हाला सिद्ध करता आला पाहिजे!

सोने जप्त होते का?

तुमचे सोने 'वैध' आहे हे सिद्ध करण्यासाठी, सोने ठेवण्याची मर्यादा पुरुष आणि महिलांसाठी (विवाहित/अविवाहित) वेगळी निश्चित केली आहे. हे सोने कोणत्याही परिस्थितीत जप्त केले जात नाही.

सोने घरात ठेवण्याची सुरक्षित मर्यादेचा आपण विचार केल्यास विवाहित महिला ५०० ग्रॅम (अर्धा किलो), अविवाहित महिला २५० ग्रॅम तर पुरुष मग ते विवाहित असो की, अविवाहित जवळपास १०० ग्रॅम सोने ठेवता येईल. हा एक सुरक्षित मार्ग आहे. यापेक्षा जास्त सोने ठेवायचे असेल तर मग सुरक्षेचे मार्गही तितकेच वाढवणे आवश्यक असते.

'लिमिट' ओलांडली तर?

सोने घरात ठेवण्याची मर्यादा 'बिना-कागदपत्रां'च्या सोन्यासाठी लागू आहे. म्हणजेच जर तुमच्याकडे सोन्याची खरेदी पावती, वारसा हक्काची कागदपत्रे किंवा वैध उत्पन्नाचा पुरावा असेल, तर तुम्ही वरील मर्यादेपेक्षा कितीही जास्त सोने घरात कायदेशीररित्या ठेवू शकता.

थोडक्यात हे वाचा

थोडक्यात, तुमच्या घरात कितीही सोने असले तरी चालते, फक्त त्याचे योग्य 'प्रमाण' आणि 'स्रोत' सिद्ध करण्यासाठी कागदपत्रे तुमच्याकडे तयार हवीत!

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+