सोने खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! जाणून घ्या 22 अन् 24 कॅरेटचे आजचे ताजे नवीन दर
मागील दोन दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये घसरण होत आहे. आज 6 ऑगस्ट रोजी देखील पुन्हा एकदा सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली. त्यामुळे ऐन श्रावण महिन्यात आता सोने खरेदीचा चांगला योग ग्राहकांसाठी जुळून आला आहे.
जर तुम्ही आज सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. चला तर मग जाणून घेऊया आजचे सोन्या-चांदीचे दर...

आजचा भारतातील सोन्याचा भाव
- आज भारतात 24 कॅरेट सोन्याचा भाव 870 रुपयांनी घसरून 69,710 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आणि 100 ग्रॅम सोन्याचा भाव आज 8,700 रुपयांनी घसरून 6,97,100 रुपयांवर आला आहे.
- 22 कॅरेट सोन्याचा भाव 800 रुपयांच्या घसरले असून 63,900 रुपये प्रति 10 ग्रॅम झाले आहेत. 22 कॅरेट सोन्याचा 100 ग्रॅमचा भाव आज 8000 रुपयांनी घसरून 6,39,000 रुपयांवर आला आहे.
- 18 कॅरेट सोन्याचा भाव आज 660 रुपयांनी घसरून 52,280 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि 100 ग्रॅम 18 कॅरेट सोन्याचा भाव 6,600 रुपयांनी घसरून 5,22,800 रुपयांवर आला.
- मंगळवारी भारतातील चांदीच्या दरातही मोठी घसरण झाली असून, 1 किलो चांदीचा भाव आज 3200 रुपयांनी घसरून 82,500 रुपयांवर आला आहे.
भारतात आज चांदीचा दर
भारतातील चांदीचा भाव आज 3200 रुपयांनी घसरून 82,500 रुपयांवर आला आहे. आज भारतात 100 ग्रॅम चांदीचा भाव 320 रुपयांनी घसरून 8,250 रुपयांवर आला आहे.
दहा दिवसातील सोन्याच्या दरातील बदल
22 कॅरेट प्रति 10 ग्रॅम सोन्याच्या किमतीत गेल्या 10 दिवसात भारतातील सोन्याचे भाव आज 800 रुपयांनी घसरले आहेत.
- 5 ऑगस्टला स्थिर राहिले होते.
- 4 ऑगस्टला स्थिर राहिले.
- 3 ऑगस्टला 100 रुपयांनी घसरले.
- 2 ऑगस्टला 300 रुपयांनी वाढले.
- 1 ऑगस्टला 500 रुपयांनी वाढले.
- 31 जुलैला 800 रुपयांनी वाढले.
- 30 जुलैला 200 रुपयांनी घसरले.
- 29 जुलै रोजी ते 150 रुपयांनी वाढले
- 28 जुलै रोजी स्थिर राहिले.
- 27 जुलै रोजी 250 रुपयांनी वाढले आणि 26 जुलै रोजी 1000 रुपयांनी घसरले.
काही प्रमुख शहरातील 1 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर
पुणे :
पुण्यात 1 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 6,331रुपये आहे.
मुंबई -
मुंबईत 1 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 6,390 रुपये आहे.
दिल्ली
दिल्लीत आज 1 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 6,405 रुपये आहे.
कोलकत्ता
कोलकत्यात 22 कॅरेट सोन्याच्या 1 ग्रॅमची किंमत 6,390 रुपये आहे.
केरळ
केरळमध्ये 6 ऑगस्ट रोजी 1 ग्रॅम 22 किलो सोन्याची किंमत 6,390 रुपये आहे.
बंगळुरू
बंगळुरूमध्ये 1 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 6,390 रुपये आहे.
चेन्नई
चेन्नईमध्ये आज 1 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत 6,400 रुपये आहे.












Click it and Unblock the Notifications