Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

मोठी बातमी ! सोन्याच्या किमती 'एवढ्या' हजारांनी उतरल्या; चांदी तर तब्बल ४००० हजारांनी स्वस्त, कारण..

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्क लागू केल्यानंतर, गुरुवारी भारतातील सराफा बाजारात अचानक मोठी घसरण दिसून आली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) मार्केटमध्ये चांदीचे दर ४०२५ रुपयांनी घसरून ९५,७२८ प्रति किलो झाले. सोन्याच्या किमतीतही प्रतितोळा १००० रुपयांची घसरण झाली. २४ कॅरेटच्या सोन्याचा दर आज ८९,७२३ वर आला. दिवसअखेरपर्यंत या किंमती आणखी घसरू शकतात, असा अंदाजही व्यक्त करण्यात येत आहे.

gold prices fall

ट्रम्प यांच्या निर्णयाचा फटका

सोने आणि चांदीच्या किमती घसरण्याचे मुख्य कारण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा टॅरिफशी संबंधित निर्णय असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या अनेक उत्पादनांवर २७% पर्यंत शुल्क लादले आहे. परंतु सोने आणि चांदीला या करातून सूट दिली आहे. त्यामुळे बाजारात त्यांच्या किमती कमी झाल्या आहेत, असे सांगितले जात आहे. बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की गुंतवणूकदारांनी सावधगिरी बाळगावी आणि काळजीपूर्वक विचार करून गुंतवणूकीचे निर्णय घ्यावेत.

किती घसरले सोने

आज सकाळी भारतीय सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९१,२०५ रुपये होती. २२ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम ८३,५४४ आणि ७५० शुद्धतेचे सोने प्रति १० ग्रॅम ६८,४०४ या दराने विकले गेले.

किती घसरली चांदी

सराफ बाजारात सोन्यासोबत आज चांदीच्या किमतीही घसरल्या. सकाळच्या व्यवहारात चांदी २२०० रुपयांनी स्वस्त होऊन ९७,३०० रुपये प्रति किलो झाली. २८ मार्च रोजी चांदीची किंमत १ लाख रुपयांच्या पुढे गेली. २७ मार्च रोजी त्याची किंमत प्रति किलोग्रॅम १,०१,००० रुपयांपर्यंत वाढली होती. परंतु गेल्या एका आठवड्यात ते सतत घसरत आहे आणि आतापर्यंत चांदी ₹ 4000 पेक्षा जास्त स्वस्त झाली आहे.

चढ उतारानंतर घसरण

अलिकडे सोन्याच्या किमतीत सतत वाढ होत होती. २८ मार्चपासून सोने १००० रुपयांपेक्षा जास्त महाग झाले आहे. तथापि, आज एमसीएक्सवर त्यात मोठी घसरण नोंदली गेली. सोन्याचे व चांदीचे दर उतरले असले तरी, ही घसरण कायम राहिल का, ही शंका उपस्थित केली जात आहे. काहींच्या मते सोन्या चांदीच्या बाजारात अजूनही घसरण होण्याची शक्यता आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+