मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात सोन्याचे दर गडगडले; खरेदीची सुवर्णसंधी, 22K आणि 24K चे ताजे भाव वाचा
Gold silver rate today : दिवाळी आणि लगनसराईच्या पार्श्वभूमीवर सोन्या-चांदीच्या खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे! गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सुरू असलेली घसरण झाली आहे. आज ७ नोव्हेंबर २०२५ रोजीही ही घसरण कायम राहिली आहे. यामुळे गुंतवणूकदारांना आणि दागिने खरेदी करू इच्छिणाऱ्या सामान्य नागरिकांना सलग पाचव्या दिवशी स्वस्त दरात सोने खरेदी करण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.

राजधानी दिल्लीसह देशाची आर्थिक राजधानी मुंबईत तसेच पुणे, नागपूर, नाशिक आणि जळगावमधील सोन्याचे 24 कॅरेट आणि 22 कॅरेटचे ताजे दरातही फरक जाणवला आहे. सध्याच्या दरातील बदलामागील कारणे आणि आगामी काळात सोन्याचे भाव कसे राहतील, याबाबत तज्ज्ञांचा नेमका काय अंदाज आहे, हे सविस्तर जाणून घेऊया.
आजचे महाराष्ट्रातील सोन्याचे दर (प्रति १० ग्रॅम)
मुंबई (Mumbai)
- २४ कॅरेट सोने (शुद्ध): ₹ १,२१,९१०
- २२ कॅरेट सोने (दागिने): ₹ १,११,७५०
पुणे (Pune)
- २४ कॅरेट सोने (शुद्ध): ₹ १,२१,९१०
- २२ कॅरेट सोने (दागिने): ₹ १,११,७५०
नागपूर (Nagpur)
- २४ कॅरेट सोने (शुद्ध): ₹ १,२२,५७०
- २२ कॅरेट सोने (दागिने): ₹ १,१२,३५०
नाशिक (Nashik)
- २४ कॅरेट सोने (शुद्ध): ₹ १,१७,८६०
- २२ कॅरेट सोने (दागिने): ₹ १,१२,२५०
जळगाव (Jalgaon)
- २४ कॅरेट सोने (शुद्ध): ₹ १,२०,४१९
- २२ कॅरेट सोने (दागिने): ₹ १,१०,३०४
एकक : चांदीचा दर
प्रति : १ ग्रॅम ₹ १५२.५०
प्रति १ किलोग्रॅम : ₹ १,५२,५००
सोन्याच्या दरासंदर्भात तज्ज्ञांचा अंदाज काय?
सोन्याच्या दरांमध्ये झालेली घसरण पाहता, तज्ज्ञांनी पुढील अंदाज व्यक्त केले आहेत.
अल्पकालीन अंदाज
- जागतिक बाजारपेठेत डॉलरची मजबूती आणि अमेरिकेच्या व्याजदर कपातीबद्दलची अनिश्चितता यामुळे सोन्याचे दर दबावाखाली राहू शकतात.
- काही तज्ज्ञांनुसार, नजीकच्या काळात दर एका विशिष्ट मर्यादेत (Range-Bound) राहण्याची किंवा किंचित खाली जाण्याची शक्यता आहे, त्यामुळे सपोर्ट लेव्हलजवळ (Support Zones) खरेदी करण्याचा सल्ला दिला जात आहे.
मध्यम ते दीर्घकालीन (Medium to Long-Term) दृष्टिकोन:
- सोन्याचे भाकीत पुन्हा 'तेजीचे' होत आहे. युबीएस सारख्या तज्ज्ञ संस्थांच्या मते, सध्याची घसरण तात्पुरती असू शकते.
- आर्थिक अनिश्चितता, वाढती भू-राजकीय जोखीम आणि जगभरातील मध्यवर्ती बँकांची सोन्याची खरेदी यामुळे सोन्याला दीर्घकाळात सकारात्मक आधार मिळण्याची शक्यता आहे.
- नोव्हेंबरच्या मध्यापासून भारतात सुरू होणाऱ्या लग्नाच्या हंगामातील मागणीमुळे तसेच डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात सोन्याच्या दराला पाठिंबा मिळतो, ज्यामुळे दरात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे.












Click it and Unblock the Notifications