Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gold silver rate today : होळीच्या दिवशी सोन्या-चांदीच्या दर वाढले! किती झाले भाव? आणि कशामुळे वाढले?

Gold Silver Rate Today Holi Special, 14 March 2025 : सोन्या-चांदीच्या किमतींनी होळीच्या दिवशी सर्व विक्रम मोडले आहेत. जागतिक व्यापारातील तणाव, डॉलर निर्देशांकातील घसरण आणि फेडरल रिझर्व्हकडून संभाव्य व्याजदर कपातीमुळे सराफा बाजारात प्रचंड वाढ होत आहे.

गुड रिटर्न्स वेबसाइटनुसार, 24 कॅरेट सोन्याचा भाव शुक्रवारी 10 रुपयांनी वाढून 88,590 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. त्याच वेळी 22 कॅरेट सोन्याचा भाव 10 रुपयांनी वाढून 81,210 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. देशातील विविध शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या किमती जाणून घेऊया...

Gold silver rate today

Delhi Gold Rate: दिल्ली : 88,740 रुपये

  • मुंबई, कोलकाता आणि चेन्नईत : 88,590 रुपये
  • चांदीचा भावही गगनाला भिडला
  • चांदी 100 रुपयांनी महागून 1,01,100 रुपये प्रति किलो झाला आहे.
  • चेन्नईमध्ये चांदीची सर्वाधिक किंमत 1,10,100 रुपये प्रति किलो होती.

MCX वर सोने-चांदी विक्रमी उच्चांक

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याचे एप्रिल फ्युचर्स 87,866 रुपये प्रति 10 ग्रॅम या पातळीवर पोहोचले, जे आजपर्यंतची सर्वोच्च पातळी आहे. गेल्या वर्षीच्या होळीपासून यंदाच्या होळीपर्यंत सोन्याच्या किमतीत सुमारे 30 टक्के म्हणजेच 20 हजार रुपयांची वाढ झाली आहे. चांदीची फ्युचर्स किंमतही प्रथमच 1,00,545 रुपये प्रति किलोवर पोहोचली.

सोन्याचे भाव का वाढले?

एचडीएफसी सिक्युरिटीजचे चलन आणि कमोडिटी प्रॉडक्ट्सचे प्रमुख अनुज गुप्ता यांच्या मते, अमेरिकेतील महागाईचे आकडे अपेक्षेपेक्षा अधिक घसरले असून, त्यामुळे फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची शक्यता वाढली आहे. डॉलर इंडेक्स जानेवारीच्या 110.17 च्या उच्चांकावरून 6% घसरला आहे. चीनचा सोन्याचा साठा वाढला आहे, त्यामुळे जागतिक मागणी वाढत आहे. केंद्रीय बँकांकडून सोन्याची खरेदी सलग तिसऱ्या वर्षी सुरू आहे.

सोन्याचे भाव आणखी वाढतील का?

  • तज्ज्ञांचे मत आहे की सोने आणखी वाढू शकते...
  • अनुज गुप्ता: सोन्याचा भाव 90,700 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत जाऊ शकतो.
  • अजय केडिया : सोन्याचे लक्ष्य 95,000 रुपये प्रति 10 ग्रॅम ठेवण्यात आले आहे.

चांदीचे भविष्य काय?

अनुज गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, पुढील होळीपर्यंत चांदी 1,08,400 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचू शकते. अजय केडिया यांनी चांदी 1,30,000 रुपये प्रति किलोपर्यंत जाण्याची शक्यता व्यक्त केली आहे, ज्यामुळे गुंतवणूकदारांना 37% पर्यंत परतावा मिळू शकतो.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+