Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

सोन्या-चांदीच्या भाव घसरले, महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचे दर काय आहे ते जाणून घ्या

gold silver rate today : सोने-चांदीच्या किंमतीत दररोज चढ-उतार पहायला मिळतो. मात्र आज शनिवार 22 मार्च 2025 रोजी सोन्यांच्या भावात घसरण झाली आहे. लग्नसराईच्या काळात लोक सोने खरेदी करण्याचा विचार करत असताना सतत बदलणारे दर ग्राहकांना विचार करण्यास भाग पाडत आहेत.

भारतात सोन्याकडे केवळ दागिने म्हणूनच पाहिले जात नाही तर एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून देखील पाहिले जाते. खासकरुन सण आणि लग्नसराईच्या काळात सोन्याच्या किमतींवर सर्वांचे लक्ष असते. देशभरात आज 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमच्या किमतीत 230 रुपयांची घसरण झाली आहे. सध्या देशातील सर्व शहरांमध्ये प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 90 हजार रुपयांच्या पुढे आहे. तर आपण दागिने खरेदीदारांबद्दल बोलायचं झालं तर 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 82,000 रुपयांपेक्षा जास्त आहे.

Gold Price Today

येत्या काळात सोने आणि चांदीच्या किमती आणखी वाढू शकतात, असे बाजारातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. चांदीच्या किमतीतही घसरण दिसून येत आहे. चांदी प्रति किलो 1,000 रुपयांनी स्वस्त झाली आहे. सध्या देशात एक किलो चांदीची किंमत 1,02,900 रुपये आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे ते जाणून घेऊया?

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे भाव

मुंबई - आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,978 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,230 आहे.

ठाणे - आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,978 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,230 आहे.

पुणे- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,978 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,230 आहे.

नागपूर - आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,978 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,230 आहे.

नाशिक - आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,981 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,233 आहे.

जळगाव - आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,978 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,230 आहे.

छत्रपती संभाजीनगर - आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,978 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,230 आहे.

मिस्ड कॉलद्वारे सोन्याची किंमत कशी तपासायची?

तुम्ही स्वतः सोन्याचे ताजे दर देखील सहजपणे शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त एक मिस्ड कॉल (ब्लँक कॉल) करावा लागेल. तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचे आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच, तुम्हाला सोन्याच्या दराबाबत माहिती असलेला एसएमएस येईल.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+