Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gold Price Today : आज सोनं स्वस्त की महाग ? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव

Gold Rate Today: सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार पहायला मिळते. मात्र आज मंगळवारी 18 मार्च रोजी सोन्याच्या किंमतीत काहीशी घसरण झाली आहे. गेल्या एका आठवड्यात सोन्याच्या किंमतीत 1960 रुपयांची वाढ झाली होती. मात्र नवीन आठवडा सुरु होताच सोन्याच्या भावात 400 रुपयांनी घसरण झाली आहे.

भारतात सोन्याकडे केवळ दागिने म्हणूनच पाहिले जात नाही तर एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून देखील पाहिले जाते. खासकरुन सण आणि लग्नसराईच्या काळात सोन्याच्या किमतींवर सर्वांचे लक्ष असते.

Gold Price Today

सध्या देशातील सर्व शहरांमध्ये प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत सुमारे 89 हजार रुपायांच्या पुढे आहे. जर आपण दागिने खरेदीदारांबद्दल बोललो तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार रुपये आहे. चांदीच्या किमतीही वाढल्या आहेत. एक किलो चांदीची किंमत 1,04,000 रुपये आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे ते जाणून घेऊया?

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे भाव

मुंबई - आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 9,000 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,250 आहे.

ठाणे - आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 9,000 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,250 आहे.

पुणे - आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 9,000 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,250 आहे.

नागपूर - आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 9,000 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,250 आहे.

नाशिक- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 9,003 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,253 आहे.

जळगाव - आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 9,000 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,250 आहे.

छत्रपती संभाजीनगर - आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 9,000 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,250 आहे.

मिस्ड कॉलद्वारे सोन्याची किंमत कशी तपासायची?

तुम्ही स्वतः सोन्याचे ताजे दर देखील सहजपणे शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त एक मिस्ड कॉल (ब्लँक कॉल) करावा लागेल. तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचे आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच, तुम्हाला सोन्याच्या दराबाबत माहिती असलेला एसएमएस येईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+