Gold Rate Today: होळीनंतर सोनं पुन्हा महागलं, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे भाव
Gold Rate Today: सोने-चांदीच्या दरात सातत्याने चढ-उतार पहायला मिळते. मात्र होळीनंतर आज शनिवारी 15 मार्च रोजी सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. गेल्या एका आठवड्यात सोन्याच्या किमतीत 1000 रुपयांची वाढ झाली आहे.
भारतात सोन्याकडे केवळ दागिने म्हणूनच पाहिले जात नाही तर एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून देखील पाहिले जाते. खासकरुन सण आणि लग्नसराईच्या काळात सोन्याच्या किमतींवर सर्वांचे लक्ष असते.

देशभरात 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत 1090 रुपयांची वाढ झाली आहे. तसेच 22 कॅरेट सोन्याच्या किमतीत 1000 रुपयांची वाढ झाली आहे. सध्या देशातील सर्व शहरांमध्ये प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत सुमारे 89 हजार रुपायांच्या पुढे आहे. जर आपण दागिने खरेदीदारांबद्दल बोललो तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 82 हजार रुपये आहे. चांदीच्या किमतीही वाढल्या आहेत. एक किलो चांदीची किंमत 1,03,100 रुपये आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे ते जाणून घेऊया?
महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे भाव
मुंबई - आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,967 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,220 आहे.
ठाणे - आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,967 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,220 आहे.
पुणे - आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,967 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,220 आहे.
नागपूर - आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,967 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,220 आहे.
नाशिक- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,967 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,220 आहे.
जळगाव - आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,967 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,220 आहे.
छत्रपती संभाजीनगर - आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,967 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,220 आहे.
मिस्ड कॉलद्वारे सोन्याची किंमत कशी तपासायची?
तुम्ही स्वतः सोन्याचे ताजे दर देखील सहजपणे शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त एक मिस्ड कॉल (ब्लँक कॉल) करावा लागेल. तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचे आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच, तुम्हाला सोन्याच्या दराबाबत माहिती असलेला एसएमएस येईल.












Click it and Unblock the Notifications