Gold Silver Rate Today: आज सोनं स्वस्त की महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव
Gold Silver Rate Today: होळी सणासाठी आता फक्त दोन दिवस शिल्लक आहेत. 13 रोजी होलिका दहन साजरे केले जाईल आणि 14 मार्च रोजी रंगांची होळी खेळली जाईल. अशा परिस्थितीत तुम्ही सणासुदीला भेट म्हणून सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर सोने आणि चांदीचे भाव कमी झाले आहेत की नाही हे जाणून घेणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे.
आज 12 मार्च रोजी बुधवारी सराफा बाजारात सोन्याच्या किमतींत काहीशी वाढ झाली आहे. भारतात सोन्याकडे केवळ दागिने म्हणूनच पाहिले जात नाही तर एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून देखील पाहिले जाते. खासकरुन सण आणि लग्नसराईच्या काळात सोन्याच्या किमतींवर सर्वांचे लक्ष असते.

देशभरात 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 87 हजार रुपये आहे. जर आपण दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबद्दल बोललो तर त्याची किंमत 80 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. आज चांदीच्या किंमतीत काहीशी वाढ झाली आहे. आज एक किलो चांदीची किंमत 1000 रुपायांनी वाढ आता प्रति किलो 1,00,000. रुपये आहे. महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे ते जाणून घेऊया.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे भाव
मुंबई - आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,798 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,065 आहे.
ठाणे- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,798 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,065 आहे.
पुणे- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,798 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,065 आहे.
नागपूर- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,798 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,065 आहे.
नाशिक- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,801 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,068 आहे.
जळगाव- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,798 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,065 आहे.
छत्रपती संभाजीनगर- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,798 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,065 आहे.
मिस्ड कॉलद्वारे सोन्याची किंमत कशी तपासायची?
तुम्ही स्वतः सोन्याचे ताजे दर देखील सहजपणे शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त एक मिस्ड कॉल (ब्लँक कॉल) करावा लागेल. तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचे आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच, तुम्हाला सोन्याच्या दराबाबत माहिती असलेला एसएमएस येईल.












Click it and Unblock the Notifications