Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gold Rate Today: आज पुन्हा सोने महाग झाले का? जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव

Gold Rate Today: रविवारी 11 ऑगस्ट रोजी सोन्याच्या दरात किंचित वाढ दिसून आली. मात्र, अनेक शहरांमध्ये दर स्थिर राहिले आहेत. देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्याचा भाव 70 हजार रुपयांच्या आसपास आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरात घसरण सुरूच आहे. 2024 चा अर्थसंकल्प सादर झाल्यापासून सोन्या-चांदीच्या किमतीत घसरण दिसून येत आहे. दरम्यान वाढ झाली असली तरी ती किरकोळ आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) आज रविवारी बंद आहे. आज देशात चांदीचा भाव 83,100 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. आज दिल्लीत 22 कॅरेट सोन्याचा दर 64,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा भाव मुंबईत 64,450 रुपये, चेन्नईमध्ये 64,450 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि कोलकातामध्ये 64,450 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

Gold Rate Today

11 ऑगस्ट महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याचा भाव किती आहे?

मुंबई- आज 22 कॅरेट सोन्याची किंमत ₹ 6,445 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत ₹ 7,031 प्रति ग्रॅम आहे

पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,445 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,031 रुपये प्रति ग्रॅम आहे.

नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,445 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,031 रुपये प्रति ग्रॅम आहे.

नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा दर 6,448 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,034 रुपये प्रति ग्रॅम आहे.

घरबसल्या जाणून घ्या सोने-चांदीचा भाव

मिस्ड कॉलद्वारे तुम्ही सोन्या-चांदीची किंमत देखील तपासू शकता. 22 कॅरेट सोन्याचे आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 वर मिस कॉल करू शकता. तुम्ही मिस्ड कॉल करताच तुम्हाला सोन्याच्या दराची माहिती एसएमएसद्वारे मिळेल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+