Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gold Price Today : होळीपुर्वी सोनं महागलं, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे भाव

Gold Price Today : सोने आणि चांदीच्या किमतींत सातत्याने वाढत आहेत. आज सोन्यांच्या किमतींमध्ये काहीशी वाढ दिसून येत आहे. 10 मार्च रोजी सोमवारी सराफा बाजारात सोन्याच्या किमतींत काहीशी वाढ झाली आहे. भारतात सोन्याकडे केवळ दागिने म्हणूनच पाहिले जात नाही तर एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून देखील पाहिले जाते. खासकरुन सण आणि लग्नसराईच्या काळात सोन्याच्या किमतींवर सर्वांचे लक्ष असते.

भारतात 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 87 हजार रुपये आहे. जर आपण दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबद्दल बोललो तर त्याची किंमत 80 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. आज चांदीच्या किंमतीत काहीशी घसरण झाली आहे. आज एक किलो चांदीची किंमत 99,000 रुपये आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे ते जाणून घेऊया.

Gold Price Today

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे भाव

मुंबई - आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,782 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,050 आहे.

ठाणे- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,782 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,050 आहे.

पुणे- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,782 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,050 आहे.

नागपूर- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,782 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,050 आहे.

नाशिक- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,785 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,053 आहे.

जळगाव- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,782 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,050 आहे.

छत्रपती संभाजीनगर- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,782 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,050 आहे.

मिस्ड कॉलद्वारे सोन्याची किंमत कशी तपासायची?

तुम्ही स्वतः सोन्याचे ताजे दर देखील सहजपणे शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त एक मिस्ड कॉल (ब्लँक कॉल) करावा लागेल. तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचे आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच, तुम्हाला सोन्याच्या दराबाबत माहिती असलेला एसएमएस येईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+