Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gold Price Today : महिला दिनानिमित्त 8 मार्च रोजी सोनं स्वस्त की महाग ? जाणून घ्या आजचे भाव

Gold Price Today : सोने-चांदीच्या दरात दररोज चढ-उतार होतो. मात्र आज आंतरराष्ट्रीय महिला दिनी म्हणजेच 8 मार्च रोजी सोने स्वस्त झालं आहे. होळीपूर्वी सोने खरेदी करण्याची ही एक चांगली संधी आहे. गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत सातत्याने घसरण होत आहे. देशात 24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्याचे दर 300 रुपयांनी स्वस्त झाले आहेत.

भारतात सोन्याकडे केवळ दागिने म्हणूनच पाहिले जात नाही तर एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून देखील पाहिले जाते. खासकरुन सण आणि लग्नसराईच्या काळात सोन्याच्या किमतींवर सर्वांचे लक्ष असते.

Gold Price Today

भारतात २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 87 हजार रुपये आहे. जर आपण दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबद्दल बोललो तर त्याची किंमत 79 हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. आज चांदीच्या किमती वाढल्या आहेत. 7 मार्चच्या तुलनेत 8 मार्च रोजी चांदीच्या किमतीत 100 रुपयांची वाढ झाली आहे. एक किलो चांदीची किंमत 99,200 रुपये आहे. देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे ते जाणून घेऊया.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे भाव

मुंबई - आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,771 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,040 आहे.

ठाणे- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,771 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,040 आहे.

पुणे- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,771 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,040 आहे.

नागपूर- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,771 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,040 आहे.

नाशिक- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,771 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,040 आहे.

जळगाव- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,771 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,040 आहे.

छत्रपती संभाजीनगर- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,771 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,040 आहे.

मिस्ड कॉलद्वारे सोन्याची किंमत कशी तपासायची?

तुम्ही स्वतः सोन्याचे ताजे दर देखील सहजपणे शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त एक मिस्ड कॉल (ब्लँक कॉल) करावा लागेल. तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचे आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच, तुम्हाला सोन्याच्या दराबाबत माहिती असलेला एसएमएस येईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+