Gold Price Today : 7 मार्च रोजी सोने-चांदीचे भाव किती ? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे भाव
Gold-Silver Price Today : लगीन सराईच्या सोने-चांदीच्या दरात नेहमीच चढउतार पाहायला मिळतो. आज 7 मार्च शु्कवार रोजी सोन्याच्या किंमतीत पुन्हा एकदा काहीशी घसरण झाली आहे. 24 कॅरेट सोन्याच्या किंमतीत घसरण झाली असून ते आता प्रति 10 ग्रॅम 87 हजार रुपयांच्या घरात पोहोचलं आहे तर 22 कॅरेट सोने प्रति 10 ग्रॅम 79,900 रुपये राहिले आहे.
भारतात सोन्याकडे केवळ दागिने म्हणूनच पाहिले जात नाही तर एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून देखील पाहिले जाते. खासकरुन सण आणि लग्नसराईच्या काळात सोन्याच्या किमतींवर सर्वांचे लक्ष असते.

दरम्यान आज एक किलो चांदीची किंमत 99,100 रुपयांच्या घरात आहे. चांदीच्या किंमतीत सुमारे 1100 रुपयांची घसरण झाली आहे. 3 मार्च रोजी रोजी भारतीय सराफा बाजारात एक किलो चांदीची किंमत 97 हजार रुपयांच्या घरात होती. तर 5 मार्च रोजी चांदीचा भाव 98,000 रुपये प्रति किलो होती. मागील तीन दिवसात चांदीची किंमत मोठी वाढ झाली आहे.
महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील आजचे सोन्याचे भाव
मुंबई - आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,716 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,990 आहे.
ठाणे- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,716 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,990 आहे.
पुणे- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,716 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,990 आहे.
नागपूर- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,716 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,990 आहे.
नाशिक- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,719 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,993 आहे.
जळगाव- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,716 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,990 आहे.
छत्रपती संभाजीनगर- आज 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 8,716 आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम 7,990 आहे.
मिस्ड कॉलद्वारे सोन्याची किंमत कशी तपासायची?
तुम्ही स्वतः सोन्याचे ताजे दर देखील सहजपणे शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त एक मिस्ड कॉल (ब्लँक कॉल) करावा लागेल. तुम्ही 8955664433 वर मिस्ड कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचे आणि 18 कॅरेट सोन्याचे दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच, तुम्हाला सोन्याच्या दराबाबत माहिती असलेला एसएमएस येईल.












Click it and Unblock the Notifications