Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

महिला दिनीच सोन्याचा 'भाव' वाढला! मुंबईत 10 ग्रॅमसाठी मोजावे लागणार दीड लाखांहून अधिक; पाहा ताजे दर

Gold silver rate 8 march 2026 womens day impact : आज जागतिक महिला दिन साजरा होत असतानाच, दुसरीकडे सोन्याच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील इराण-इस्रायल तणावामुळे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे कल वाढल्याने किमतीत मोठी उसळी पाहायला मिळत आहे. मुंबईसारख्या महानगरात आज सोन्याने १.६० लाखांचा टप्पा ओलांडला आहे.

Gold silver rate 8 march 2026

मुंबईतील आजचे सुवर्ण दर (८ मार्च २०२६)

जागतिक युद्धाच्या सावटाचा परिणाम स्थानिक बाजारपेठेवर स्पष्टपणे दिसत आहे. मुंबईत सोन्याचे ताजे दर जाणून घेऊया.

  • २४ कॅरेट (शुद्ध सोने): ₹१,६३,६४० प्रति १० ग्रॅम
  • २२ कॅरेट (दागिन्यांचे सोने): ₹१,५०,००० प्रति १० ग्रॅम
  • १८ कॅरेट सोने: ₹१,२२,७३० प्रति १० ग्रॅम

चांदीच्या दरात काय स्थिती?

सोन्याच्या दरात वाढ होत असताना, चांदीने मात्र गुंतवणूकदारांना काहीसा दिलासा दिला आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून चांदीच्या दरात किंचित मंदी असून, मुंबईत चांदी आज ₹२,८५,००० प्रति किलो दराने विकली जात आहे.

भाव वाढण्यामागील मुख्य कारणे

१. युद्धजन्य परिस्थिती: इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील तणावामुळे शेअर बाजार अस्थिर आहे. अशा वेळी गुंतवणूकदार सोन्यासारख्या खात्रीशीर पर्यायाला प्राधान्य देत आहेत.

२. जागतिक मागणी: चांदीचा वापर केवळ दागिन्यांसाठीच नाही, तर इलेक्ट्रॉनिक्स आणि शस्त्र निर्मितीमध्येही होत असल्याने युद्धाच्या काळात या धातूंच्या दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळत आहेत.

सोने खरे की खोटे, हॉलमार्कची तपासणी कशी करायची?

हल्ली खरे आणि बनावट सोने सारखेच दिसत असल्याने ते ओळखायचे कसे हा अनेकांना प्रश्न असतो, सोने खरेदीवेळी आपली फसवणूक होऊ नये म्हणून दोन खास पद्धती आहेत, यातून खरे अस्सल सोने ओळखता येते.

हाॅलमार्क चाचणी : सोन्याचा दर्जा आणि गुणवत्ता तपासण्याचा असतो, त सोन्याच्या दागिन्यांवर BIS चा लोगो आणि सहा अंकी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन (HUID) क्रमांक आहे का ते तपासा. अस्सल सोन्यावर हे चिन्ह लेझरने कोरलेले असते, जे तुम्ही 'BIS Care' ॲपवर पडताळून पाहू शकता.

चुंबक चाचणी : सोने हा धातू चुंबकीय नाही. त्यामुळे सोन्याच्या दागिन्यांजवळ एखादा शक्तिशाली चुंबक नेल्यास, जर सोने चुंबकाकडे आकर्षित झाले, तर समजावे की त्यात लोखंड किंवा निकेल यांसारख्या इतर धातूंची भेसळ आहे. अस्सल सोने चुंबकाला कधीच चिकटत नाही.

(डिस्क्लेमर: वर दिलेले दर विविध विश्लेषक आणि माहिती स्रोतांवर आधारित आहेत. प्रत्यक्ष खरेदी करण्यापूर्वी स्थानिक ज्वेलर्स किंवा अधिकृत आर्थिक सल्लागाराशी चर्चा करून दरांची खात्री करावी.)

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+