Gold Silver Rate: सोन्याचे भाव घसरले, चांदीचीही अवस्था वाईट
Mumbai: सोन्याच्या दरात घसरण झाल्यामुळे सोने आता ७१ हजार रुपये प्रति १० ग्रॅमच्या जवळ पोहोचले आहे. त्याचवेळी चांदीचा भाव प्रतिकिलो ९० हजार रुपयांच्या खाली आला आहे. येत्या काळात सोन्या-चांदीच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता आहे.

सोन्याचे भाव काय आहेत?
MCX एक्सचेंजवर आज म्हणजेच मंगळवारी, ५ऑगस्ट २०२४ रोजी डिलिव्हरीसाठीचे सोने सुमारे १५२ रुपयांनी घसरून ७१ हजार ६३९ रुपये प्रति १० ग्रॅम झाले आहे. सकाळपासून सोन्यात घसरण दिसून येत आहे. आज सकाळी सोने घसरणीसह उघडले. तर ५ ऑक्टोबर २०२४ रोजी डिलिव्हरीसाठी सोन्याचा भाव १६४ रुपयांनी घसरून ७१,८९३ रुपये प्रति १० ग्रॅम आहे.
चांदीचे भाव काय आहे?
MCX एक्सचेंजवर आज म्हणजेच मंगळवारी, ५ जुलै २०२४ रोजी डिलिव्हरीसाठीची चांदी २२६ रुपयांनी घसरली आहे. चांदीचे सध्याचे भाव ८८ हजार ७७३ रुपये प्रति किलो आहेत. तर ५ सप्टेंबर २०२४ रोजी डिलिव्हरीसाठी चांदीचा भाव १०१ रुपयांनी घसरून ९० हजार ८७५ रुपयांवर पोहोचला आहे.
सोन्याचे जागतिक दर
सोन्याच्या जागतिक किमतीतही आज वाढ होत आहे. कॉमेक्सवर सोन्याची जागतिक फ्युचर्स किंमत ०.३८ टक्क्यांनी किंवा ८.८० डॉलरने ने घसरून २,३३५.६० डॉलर प्रति औंस झाली आहे. त्याच वेळी, सोन्याची जागतिक स्पॉट किंमत प्रति औंस २,३२६.०४ वर पोहोचली आहे.
चांदीचे जागतिक दर
चांदीची जागतिक किंमत आज घसरली आहे. कॉमेक्सवर चांदीची फ्युचर्स किंमत ०.१८ टक्के किंवा ०.०५ डॉलरने घसरून २९.८० डॉलर प्रति औंस झाली. त्याच वेळी, चांदीची जागतिक स्पॉट किंमत २९.४९ प्रति औंसवर पोहोचली आहे.
कालही भाव घसरले होते
कालही सोन्याच्या दरात घसरण दिसून आली. काल सोने घसरणीसह उघडले. त्याचबरोबर चांदीमध्येही सातत्याने घसरण होत आहे. आजही चांदी घसरणीसह व्यवहार करत आहे. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला सोन्या-चांदीच्या दरात वाढ होताना दिसत होती.












Click it and Unblock the Notifications