Gold Rate Today: पितृ पक्षाच्या आठवड्यातही सोने महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचे दर
Gold Rate Today 22 September 2024: श्राद्ध पक्ष म्हणजेच पितृ पक्षाच्या आठवड्यातही देशात सोन्याच्या किंमती वाढत आहेत. गेल्या आठवडाभरात सोने 1000 रुपयांनी महागले आहे. त्याचबरोबर चांदीच्या दरातही आठवडाभरात एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे.
आज, रविवार 22 सप्टेंबर 2024 रोजी देशातील जवळपास सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत सुमारे 76 हजार रुपयाच्या जवळपास आहे. तर दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 22 कॅरेट सोन्याचा दर 69 हजार रुपयांच्या पुढे आहे. चांदी आज 93,000 रुपये प्रति किलो आहे. जाणून घेऊया देशातील मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?

22 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याची किंमत किती आहे ?
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याची किंमत ₹ 6,960 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत ₹ 7,593 प्रति ग्रॅम आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹ 6,960 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹ 7,593 प्रति ग्रॅम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹ 6,960 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹ 7,593 प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹ 6,960 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹ 7,593 प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,963 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,598 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,960 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,593 रुपये प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा दर 6,960 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,593 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
सोन्याच्या नवीन किंमती तुम्ही सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications