आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण,जाणून घ्या 22 कॅरेट, 24 कॅरेट सोन्याचा दर
Gold Rate Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण आली आहे. गेल्या सात दिवसांत देशातील बहुतांश राज्यांमध्ये सोन्याचा दर सहा हजार रुपयांनी स्वस्त झाला आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वरही आज सोने स्वस्त दिसत आहे. देशातील बहुतांश शहरांमध्ये सोन्याचा किरकोळ भाव 69 ते 68 हजार रुपयांच्या आसपास आहे. चांदीचा आज चा दर 84,400 रुपये प्रतिकिलो आहे.
आज 29 जुलै रोजी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 69 हजार 140 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 63,990 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

पुणे येथे 24 कॅरेट 10 ग्रॅम ₹ 68,131.00 आहे 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅम सोन्याची किंमत ₹ 62,408.00 आहे
मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 68,990 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 63,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 63,290 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 69,040 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
कोलकात्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत 63,240 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 68,990 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 64,640 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 70,520 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.












Click it and Unblock the Notifications