Gold Rate Today: जन्माष्टमीपूर्वी सोने स्वस्त की महाग? 22 कॅरेट-24 कॅरेट सोन्याचा दर माहित आहे?
Gold Rate Today : तुम्हीही जन्माष्टमीपूर्वी सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही एक चांगली संधी आहे. सोन्याच्या दरात सलग दुसऱ्या दिवशी घसरण पाहायला मिळाली. देशातील जवळपास सर्वच शहरांमध्ये आज शनिवार, 24 ऑगस्ट रोजी सोन्याचा दर सुमारे 300 रुपयांनी स्वस्त झाला आहे. सराफा बाजारानुसार आज सोन्याच्या दरात घट झाली आहे. त्याआधी सोने 500 रुपयांनी स्वस्त झाले होते.
देशातील बहुतांश शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव सुमारे 72 हजार 700 रुपये आहे. देशातील जवळपास सर्वच शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 66 हजार 500 रुपये इतका आहे. चांदीचा भाव आज 86,600 रुपये प्रति किलो आहे. तुमच्या शहरात 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किरकोळ किंमत काय आहे ते जाणून घ्या

मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याची किंमत ₹ 6,695 प्रति ग्राम आणि 24 कॅरेट सोनेची किंमत ₹ 7,304 प्रति ग्राम आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोनेची किंमत ₹ 6,695 प्रति ग्राम आणि 24 कॅरेट सोनेची किंमत ₹ 7,304 प्रति ग्राम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,695 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,304 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,695 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,304 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,695 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,304 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,698 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,307 रुपये प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,695 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,304 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
सोन्याच्या नवीन किंमती तुम्ही सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications