Gold Rate Today: सोन्याच्या भावाने आतापर्यंतचा उच्चांक गाठला, जाणून घ्या तुमच्या शहरातील सोन्याचे दर
Gold Rate Today 26 September 2024: सोन्या-चांदीच्या भावात मोठी वाढ झाली आहे. साधारणपणे श्राद्ध पक्ष म्हणजेच पितृ पक्षादरम्यान सोन्याची मागणी कमी होते, त्यामुळे त्याच्या किमतीत घट होण्याची शक्यता असते. मात्र यावेळी तसे झाले नाही.आज गुरुवारी 26 सप्टेंबर रोजी सोन्याच्या दरात किंचित वाढ नोंदवण्यात आली आहे.
देशातील जवळपास सर्वच शहरांमध्ये 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव काही शहरांमध्ये 77 हजार रुपयांच्या पुढे गेला आहे. तर दागिने खरेदी करणाऱ्यांसाठी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा दर 70,500 रुपयांच्या पुढे आहे. तर 18 कॅरेट सोन्याचा दर 57 हजार रुपये इतका आहे. चांदीच्या दरातही वाढ दिसून आली आहे.

गेल्या आठवडाभरात चांदीच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. आज चांदीच्या दरात तीन हजार रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. चांदी आज 95,100 हजार रुपये प्रति किलो आहे. चला जाणून घेऊया राज्यातील प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय आहे?
राज्यातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याची किंमत किती आहे?
मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹7,060 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹7,702 प्रति ग्रॅम आहे.
ठाणे - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव ₹7,060 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹7,702 प्रति ग्रॅम आहे.
पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा दर 7,060 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,702 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,060 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,702 रुपये प्रति ग्रॅम आहे.
नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा दर 7,063 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,705 रुपये प्रति ग्रॅम आहे.
जळगाव - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 7,060 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,702 रुपये प्रति ग्रॅम आहे.
छत्रपती संभाजीनगर - आज 22 कॅरेट सोन्याचा दर 7,060 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,702 रुपये प्रति ग्रॅम आहे.
मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा
सोन्याच्या नवीन किंमती तुम्ही सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.












Click it and Unblock the Notifications