Gold rate today : सोनं आज पुन्हा महागलं? जाणून घ्या तुमच्या शहरातील 22 कॅरेट सोन्याचा दर किती आहेत?
Gold rate today : सोन्याच्या किंमती आता सतत वाढत आहेत. शुक्रवारी 22 नोव्हेंबरला सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. गेल्या 10 दिवसांत सोन्याच्या दरात 3600 रुपयांनी घट झाली होती, मात्र आता पुन्हा एकदा सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे.
21 नोव्हेंबर रोजी सोने 800 रुपये प्रति 10 ग्रॅमने महागले. आज चांदीच्या दरातही वाढ दिसून आली आहे. लग्नसराईच्या काळात सोन्याचे भाव कमी होण्याची शक्यता कमी आहे. येत्या काही दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

आज तुमच्या शहरात सोन्या-चांदीचा भाव किती आहे?
देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव 78 हजार रुपयांच्या पुढे आहे. ज्वेलरी खरेदीदारांसाठी 22 कॅरेट सोन्याच्या दराबाबत बोलायचे झाले तर त्याची किंमत 71 हजार रुपयांच्या पुढे आहे. चांदीच्या दरातही वाढ झाली आहे. चांदी 92,100 रुपये प्रति किलो आहे.
मोठ्या शहरांमध्ये 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर काय?
दिल्ली सोन्याचा दर: आज दिल्लीत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 78 हजार 100 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत अंदाजे 71,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
मुंबई सोन्याचा दर: मुंबईत 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,950 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,450 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
कोलकाता सोन्याचा दर: कोलकाता येथे 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,450 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,950 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
चेन्नई सोन्याची किंमत : चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,450 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,950 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
अहमदाबाद सोन्याचा दर: अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 78,000 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
लखनऊ सोन्याचा दर: लखनऊमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 71,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 78,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
जयपूर सोन्याची किंमत : जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 78,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
पाटणा सोन्याचा दर: पाटण्यात 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,500 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 78,00 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
हैदराबाद सोन्याची किंमत : हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,550 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,950 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
गुरुग्राम सोन्याचा दर: गुरुग्राममध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 78,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
बंगळुरू सोन्याची किंमत : बंगळुरूमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,450 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 77,950 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.
नोएडा सोन्याची किंमत : नोएडामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत 71,600 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 78,100 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.












Click it and Unblock the Notifications