Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Gold Rate Today : सोने स्वस्त की महाग? 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचा दर जाणून घ्या

Gold Rate Today : आज गुरुवार 22 ऑगस्ट रोजी सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. 24 कॅरेट सोन्याचा भाव बहुतांश शहरांमध्ये 73 हजार रुपयांच्या पुढे आहे. देशातील जवळपास सर्वच शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर 67 हजार रुपयांच्या आसपास आहे.

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर देखील सोन्याच्या किमतीत किंचित वाढ दिसून आली आहे. तर चांदीचा भाव 86,900 रुपये प्रति किलो आहे. तुमच्या शहरात 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याची किरकोळ किंमत जाणून घ्या.

Gold Price Today

मुंबई - आज 22 कॅरेट सोन्याची किंमत ₹ 6,680 प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याची किंमत ₹ 7,287 प्रति ग्रॅम आहे.

पुणे - आज 22 कॅरेट सोन्याचा दर 6,680 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,287 रुपये प्रति ग्रॅम आहे.

नागपूर - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,680 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,287 रुपये प्रति ग्रॅम आहे.

नाशिक - आज 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,683 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,290 रुपये प्रति ग्रॅम आहे.

औरंगाबाद - आज 22 कॅरेट सोन्याचा दर 6,680 रुपये प्रति ग्रॅम आणि 24 कॅरेट सोन्याचा दर 7,287 रुपये प्रति ग्रॅम आहे.

24 कॅरेट आणि 22 कॅरेट सोन्यात काय फरक आहे?

- 24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध मानले जाते. तर 22 कॅरेट सोने दागिने बनवण्यासाठी सर्वोत्तम आहे.

- 24 कॅरेट सोने हे सोन्याची 99.9 टक्के शुद्धता दर्शवते, त्यात इतर कोणताही धातू मिसळलेला नसतो. तर 22 कॅरेट सोन्यामध्ये सोन्याचे 22 भाग आणि चांदी, निकेल किंवा इतर कोणत्याही धातूचे दोन भाग असतात.

- 24 कॅरेट सोने खूप मऊ आणि लवचिक आहे. ते सहजपणे दुमडले जाऊ शकते. 22 कॅरेट सोने कठिण असले तरी ते सहज वाकता येत नाही.

- 24 कॅरेट सोन्याची किंमत 22 कॅरेट सोन्यापेक्षा नेहमीच जास्त असते.

- 24 कॅरेट सोन्याचा रंग चमकदार पिवळा आहे. तर 22 कॅरेट सोन्याचा रंग काहीसा निस्तेज असतो कारण त्यात धातू मिसळलेले असतात.

मिस कॉल द्या सोन्याचे भाव तपासा

सोन्याच्या नवीन किंमती तुम्ही सहज शोधू शकता. यासाठी तुम्हाला फक्त मिस कॉल करावा लागेल. 8955664433 वर मिस कॉल देऊन 22 कॅरेट सोन्याचा आणि 18 कॅरेट सोन्याचा दर जाणून घेऊ शकता. तुम्ही ब्लँक कॉल करताच तुम्हाला एक एसएमएस येईल, ज्यामध्ये सोन्याच्या दराविषयी माहिती दिली जाईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+