Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Today Gold Rate : सलग दुसऱ्या दिवशी सोनं 4 हजारांनी घसरलं, जाणून घ्या- तुमच्या शहरातील सोन्याचे भाव

Gold Rate Today: भारत आणि पाकिस्तानमध्ये सीजफायरचा निर्णय झाल्यानंतर सर्व बाजारपेठा आता पूर्ववत होऊ लागल्या आहेत. त्याचबरोबर सीमारेषेलगत असलेल्या राज्यांमध्येही पूर्वी सारखीच स्थिती होत आहे. अशातच, सराफा बाजारातही मोठी उलथापालथ होत आहे.

सीजफायरचा निर्णय झाल्यानतंर गेल्या 48 तासांत सोन्याचा भाव तब्बल 8 हजारांनी घसरला आहे. भारत पकिस्तान युद्धानंतर 4000 रुपयांनी घसरलेले सोने सलग दुसऱ्या दिवशी देखील पुन्हा 4 हजारांनी खाली आल्याचे सराफा बाजारातील आकड्यांवरुन समोर आले.

रविवारी (11 मे) 96 हजार 710 रुपयांवर असलेल्या सोन्याचा भाव आता आणखी 4 हजार रुपयांनी घसरला. आता प्रति 10 ग्रॅम सोन्याचा भाव 92 हजार 910 रुपयांवर आल्याचे दिसून येत आहे. अर्थात प्रत्येक शहरातील सोन्याचे दर हे स्थानिक टॅक्सनुसार वेगवेगळे असतात हे देखील समजून घेणे गरजेचे आहे.

Today Gold Rate

सोन्याचा आजचा भाव किती आहे?

इंडियन बुलियन ज्वेलर असोसिएशनच्या आजच्या आकडेवारीनुसार, 12 मे रोजी, मुंबई, पुण्याच्या सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याची किंमत 92 हजार 710 एवढी झाली. तर 22 कॅरेट सोन्याला प्रति 10 ग्रॅम 85,287 रुपयांचा भाव सुरु आहे.

गेल्या आठवड्यात 1 लाख 500 रुपये असणाऱ्या सोन्याचा भाव रविवारी 96,710 रुपयांवर आला. तर सोमवारी तो आणखी 4000 रुपयांनी घसरला असून प्रति 10 ग्रॅम सोन्यामागे 92 910- 93010 रुपये भाव झाला आहे.

देशातील वेगवेगळ्या शहरांमध्ये सोन्याची किंमत किती आहे?

  • दिल्ली सोन्याचा दर: आज दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 98,500 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम सुमारे 90,300 रुपये आहे.
  • मुंबई सोन्याचा दर: मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमची किंमत 98,350 रुपये आहे. 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 90,150 रुपये आहे.
  • कोलकाता सोन्याचा दर : कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 90,150 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 98,350 रुपये आहे.
  • सोन्याचा भाव चेन्नई : चेन्नईमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 90,200 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 98,400 रुपये आहे.
  • अहमदाबाद सोन्याचा दर : अहमदाबादमध्ये 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 90,200 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 98,400 रुपये आहे.
  • लखनऊ सोन्याचा दर : लखनऊमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 90,150 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 98,350 रुपये आहे.
  • जयपूरमध्ये सोन्याचा भाव : जयपूरमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 90,150 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 98,350 रुपये आहे.
  • पटना सोन्याचा दर : पटनामध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 90,150 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 98,350 रुपये आहे.
  • सोन्याची किंमत हैदराबाद: हैदराबादमध्ये 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 90,150 रुपये आहे. 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 98,350 रुपये आहे.
  • गुरुग्राम सोन्याचा दर: गुरुग्राममध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९०,२०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९८,४०० रुपये आहे.
  • सोने का भाव बेंगळुरू: बेंगळुरूमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९०,२०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९८,४०० रुपये आहे.
  • सोन्याचा भाव नोएडा: नोएडामध्ये २२ कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ९०,३०० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ९८,५०० रुपये आहे.

सोन्याच्या भावात दुसऱ्या दिवशी घसरण का झाली?

अमेरिकेच्या टॅरिफ धोरणानंतर संपूर्ण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत खळबळ उडाली. जगभरातील शेअरमार्केट गडगडल्यानंतर सोन्याच्या भावाने आतापर्यंतचा सर्वाधिक उच्चांक गाठला होता.

देशांतर्गत सोन्याच्या किमतीही वाढल्या. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली. त्याचबरोबर बँक ऑफ इंग्लंडच्या चलनविषयक धोरण निर्णयांमुळे गेल्या आठवड्यात सोन्या चांदीच्या किमतीत लक्षणीय चढ-उतार दिसून आले.

भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरमुळे शेजारील देशांमधील तणाव वाढला, ज्यामुळे मौल्यवान धातूंमध्ये सुरक्षित गुंतवणूक वाढली. एकीकडे भारत पाकिस्तान तणाव परिस्थिती निवळण्याची स्थिती असतानाच अमेरिकेने चीनमधील वस्तूंवरील आयात शुल्क 145 टक्क्यांवरून कमी करून 30 टक्क्यांपर्यंत केले आहे. या निर्णयाचा परिणामही आजच्या सोन्याच्या दरघसरणीत झाल्याचा दावा सराफा बाजाराशी निगडीत असलेल्या तज्ज्ञांनी केला आहे.

(विशेष सूचना : सोन्याचे भाव प्रत्येक शहरातील वेगवेगळे असू शकतात, स्थानिक कर व अन्य बऱ्याच गोष्टी त्यात समाविष्ट असतात, त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी संबंधितांचा सल्ला जरूर घ्यावा)

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+